प्रतिनिधी,
मलकापूर : सामाजिक कार्याची सातत्याने जोपासना करत समाजहितासाठी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविणारे युवा कार्यकर्ते उज्ज्वल इंगळे यांची बजरंगी युथ फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या मलकापूर तालुका उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष बजरंगी जीवनसिंग राजपूत यांनी नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली.उज्ज्वल इंगळे यांनी अनेक वर्षांपासून विविध सामाजिक संघटनांमधून कार्य करत समाजसेवेचा आदर्श निर्माण केला आहे. रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत, गोसेवा, तसेच विविध जनहिताचे उपक्रम राबविण्यात त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. त्यांच्या निस्वार्थ सामाजिक कार्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास आणि आदराचे स्थान आहे.
त्यांच्या कार्याची दखल घेत बजरंगी युथ फाऊंडेशनने त्यांच्यावर मलकापूर तालुक्याच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. या नियुक्तीमुळे सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून तसेच मित्रपरिवार आणि नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.नियुक्तीनंतर बोलताना उज्वल इंगळे म्हणाले, "संघटनेने माझ्यावर दाखविलेला विश्वास मी सार्थ ठरविण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. संघटनेची ध्येय-धोरणे आणि समाजहिताचे उपक्रम तळागाळातील प्रत्येक गावापर्यंत पोहोचविण्यासाठी तन, मन आणि धनाने कार्य करेन. समाजातील गरजू, वंचित आणि दुर्बल घटकांच्या सेवेसाठी संघटनेच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे काम करण्याचा माझा संकल्प आहे."उज्ज्वल इंगळे यांच्या या नियुक्तीमुळे मलकापूर तालुक्यात बजरंगी युथ फाऊंडेशनचे सामाजिक कार्य अधिक व्यापक होईल, तसेच युवकांना समाजकार्यात सहभागी होण्यासाठी नवी प्रेरणा मिळेल, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी व्यक्त केला आहे.
إرسال تعليق