मोताळा:- तालुक्यातील पोफळी येथे वारकरी संप्रदायाच्या विचारांचा जागर आणि संत साहित्यांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य जिल्हा बुलढाणा तालुका मोताळा शाखा पोफळी च्या वतीने आज दि 12/6/2026 रोज शुक्रवारला आढावा बैठक व फलकाच्या अनावरण करण्यात आले सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात सांप्रदायाच्या परंपरेनुसार दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आली तसेच फलकाचे उद्घाटन जिल्हा कार्याध्यक्ष ह भ प श्रीकृष्ण महाराज सरोदे यांच्या हस्ते करण्यात आले नंतर सभेला सुरुवात करण्यात आली सभेचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष ह. भ. प.गजानन महाराज गायकवाड प्रमुख अतिथी जिल्हा महिला अध्यक्ष ह.भ.प. मेघाताई राजेंद्र सैतवाल कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले लेखा सचिव ह.भ.प.विठ्ठल पाटील नांदुरा तालुका अध्यक्ष ह.भ.प.सुरेश महाराज शिंगोटे ह भ प गणेश महाराज जंवजाळ शेगाव तालुका अध्यक्ष मलकापूर तालुका अध्यक्ष ह.भ.प.गजानन महाराज म्हैसागर तालुका अध्यक्ष ह.भ.प. राजीव महाराज खंडारे मोताळा तालुका सचिव ह.भ.प विनायक महाराज खाकरे विशेष उपस्थिती महिला जिल्हाकार्याध्यक्ष ह.भ.प.वनमालाताई भोपळे मलकापूर महिला तालुका अध्यक्ष ह.भ.प.बेबीताई तायडे खामगाव तालुका अध्यक्ष ह.भ.प.लक्ष्मीबाई ठाकरे बुलढाणा जिल्हा सचिव ह.भ.प. वर्मिला ताई सुशीर तसेच गावातील महिला हरिपाठ भजनी मंडळ टाळकरी मंडळी गावकरी मंडळी सभेमध्ये सूत्रसंचालन व्यवहारे गुरुजी यांनी केले सर्व मान्यवरांचा पोफळी गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला प्रास्ताविक मोताळा तालुका अध्यक्ष ह.भ.प.योगेश महाराज किन्होळकर यांनी प्रास्ताविक केले नंतर जिल्हा कार्याध्यक्ष ह.भ.प.सरोदे महाराज यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जिल्हा महिला अध्यक्ष बुलढाणा ह.भ.प. सौ मेघाताई राजेंद्र सैतवाल यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना सांगितले की हरिपाठ मंडळाच्या माध्यमातून महिलांनी मुलांवर असे संस्कार करा की प्रत्येक घरामध्ये एक तरी तुकोबा तयार झाला पाहिजे ही काळाची गरज आहे. तसेच जिल्हा महिला कार्याध्यक्ष ह.भ.प.वनमाला ताई भोपळे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. नांदुरा तालुका अध्यक्ष ह.भ.प. सुरेश महाराज शिंगोटे यांनी आपल्या मनोगतातुन वारकरी साहित्य परिषदेचे पूर्ण महाराष्ट्रामध्ये घराघरात वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार हा महिला हरिपाठ मंडळाच्या माध्यमातून व सर्व पुरुष मंडळी टाळकरी मंडळी यांच्या माध्यमातून हा पोहोचला पाहिजे संतांचे आचार विचार हे घराघरात त्यांचे संस्कार आपल्या मुलांवर हरिपाठाच्या माध्यमातून हे दिल्या गेले पाहिजे आज ही काळाची एक गरज आहे " गाईची तृषा हरू का व्याघ्रा वीस होऊनी मारू ऐसे नेणची का करू तो ये जैसे पाणी" ज्याप्रमाणे गायची तहान भागवावी का वाघाला विषा प्रमाणे होऊन मारावी असे मनात आणीत नाही त्याप्रमाणे स्त्री पुरुष किंवा कुठल्याही जिवाचा द्वेष संत किंवा देव करीत नाही पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये हा भेद नसावा आई वडील मुलांवर संस्कार टाकू शकतात म्हणून महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. विठ्ठल पाटील काकाजी यांची धर्म पत्नी ह.भ.प.मालूदीदी यांनी या महिला हरिपाठा ची स्थापना 11/11/2011 मध्ये केलेली आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये हरिपाठ मंडळाचा सांप्रदायाचा प्रचार आणि प्रसार हा वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून आज होत आहे त्यानंतर जिल्हा अध्यक्ष ह.भ.प.गजानन महाराज गायकवाड यांनी आपल्या सांप्रदायाच्या वारकरी साहित्य परिषदे संघटने बाबत आपले मनोगत व्यक्त केले त्या ठिकाणी वारकरी साहित्य परिषदेच्या नवीन नियुक्ती या सभेमध्ये करण्यात आले. मोताळा तालुका कार्याध्यक्ष म्हणून गुणवंतराव पाटील व्यवहारे यांची नियुक्ती करण्यात आली. मोताळा महिला तालुका अध्यक्ष सौ.संगीता ताई बढे यांची नियुक्ती करण्यात आली. मोताळा साहेबराव महाराज भुजाडे खामखेड यांची कोषाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. संजय दळवी यांची तालुका मोताळा सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. आणि सर्व महिला हरिपाठ भजनी मंडळ यांना जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्ष आणि सर्व तालुका अध्यक्ष यांच्या वतीने प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. आणि सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार या कार्यक्रमाचे आयोजक गुणवंतराव पाटील यांनी आभार प्रदर्शन केले व कार्यक्रम यशस्वी ते साठी परिश्रम जिल्हा कार्याध्यक्ष ह. भ. प. श्रीकृष्ण महाराज सरोदे यांनी घेतले तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि.वारकऱ्यांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला.
पोफळी येथे वारकरी संप्रदायाच्या विचारांचा जागर, वारकरी साहित्य परिषद संपन्न..!
Hanuman Sena News
0
إرسال تعليق