मलकापूर:- मलकापूर शहरातील भाग 2 नालंदा नगर ,शिवशक्ती नगर ,साईनगर मधील नागरिकांमध्ये प्रचंड संताप दिसून येत आहे ज्यांची परिणती महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. सदर परिसरातील कमी दाबाने वीजपुरवठा आणि सततच्या विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त होत आहे.सध्या या परिस्थितीत असलेले रोहीत्र 100 के.व्ही असून यावर दिवसेंदिवस भार वाढत असून ग्राहकांना मिळणारी विद्युत वीज पुरवठा हा कमी प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा नियमित खंडित होण्याच्या समस्या निर्माण होत आहे.त्याचबरोबर लोकांचे घरगुती विद्युत उपकरणे खराब होत आहे.बहुतांश लोकांचे उपकारणे जळून खाक झालेली आहेत.उन्हाळ्यात वाढलेल्या विजेच्या वापरामुळे सध्याची यंत्रणा अपुरी पडत असून विशेषता रात्रीच्या वेळी नागरिकांना उकाडा सहन करावा लागत आहे.लहान मुले ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना याचा मोठा त्रास होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.जर एखादी अनुसूचित घटना घडली तर त्यास महावितरण प्रशासन जबाबदार राहील,तरी आपण नवीन रोहित्र 200 के.व्ही. चे लवकरात लवकर बसवावे अन्यथा आम्ही सर्व नागरिक लोकशाही मार्गाने आंदोलन करू असा इशारा देण्यात आला.अतिरिक्त रोहित्र बसविणे आणि कमी होल्टेज चा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याची मागणी केली आहे.यावेळी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष नानाभाऊ येशी,शिरीष भाऊ चव्हाण, एकनाथ इंगळे, एस के शिरसाट, पंकज झनके, अजय झनके, विष्णू झनके ,आशिष झनके, पंकज भंडारी, सुशील सरकटे, गणेश रायपुरे, सतीश झनके, शुभम चोरडिया, बाळू रायपुरे ,कुणाल मोरे ,विशाल चव्हाण, नागसेन धुरंदर, शिवचरण म्हस्कर, बाळासाहेब सावळे, अमोल खराटे, धीरज जाधव, पवन तळेकर, परमानंद धोरण, योगेश पाटील, प्रेमानंद धोरण इत्यादी नगरवासी उपस्थित होते
सतत विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे महावितरण प्रशासनाला 200 के.व्ही.चे रोहित्र बसवण्याची मागणी- भाजपा युवा मोर्चा
Hanuman Sena News
0
إرسال تعليق