मलकापूर :- नगर सेवा समिती द्वारा संचालितलिलाधर भोजराज चांडक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल 97.83 टक्के लागला आहे. विद्यालयाने यंदाही चांगल्या निकालाची परंपरा कायम राखली आहे.यंदाच्या निकालात 124 विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणी, 88 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, 49 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी तर 10 विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण श्रेणी प्राप्त केली आहे. एकूण 271 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच 85 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 35 आहे.विद्यालयातून कु. श्रद्धा गणेश तायडे हिने 92.80 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. कु. स्वाती प्रभाकर म्हसागर हिने 91.80 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर कु.आरुषी नितीन बेलोकर याने 91.00 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.विद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षकवृंद तसेच पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांच्या सहकार्याच्या बळावर हे यश मिळविल्याची भावना व्यक्त करण्यात आली.परीक्षेत यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक व पालकांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत असून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.
दहावीच्या निकालात लिलाधर भोजराज चांडक विद्यालयाची उज्ज्वल कामगिरी..
Hanuman Sena News
0
إرسال تعليق