Hanuman Sena News

जळगाव पोलिसांचे“ऑपरेशन ड्रॉप केस “ “सर्वात मोठा”आणि “यशस्वी” “सर्जिकल स्ट्राइक”.



 जळगाव (मुक्ताईनगर) :- “ड्रॉप केस’ साठी कुप्रसिद्ध मुक्ताईनगर तालुक्यातील पाचही गावांवर पोलिसांचा पहाटे “सर्वात मोठा” आणि “यशस्वी” “सर्जिकल स्ट्राइक  म्हणजेच- ऑपरेशन ड्रॉप केस  हे ऑपरेशन राबवले आहे मुक्ताईनगर पोलीस स्टेशन हद्दीतील लालगोटा, हलखेडा, माधापुरी, जोंधनखेडा आणि चारठाणा ही गावे गेल्या अनेक वर्षांपासून विशिष्ट प्रकारच्या गुन्ह्यांमुळे चर्चेत आहेत.या गावांमधून काळी हळद, नागमणी, रेड मर्क्युरी, सफेद बिबा, उलटी वासन, सुलेमानी पत्थर, सेकंड करन्सी, अॅल्युमिनियम भंगार, जुने सोने, कॉपर, शंख आणि डबल इंजिन यांसारख्या कथित दुर्मिळ वस्तूंचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून लोकांना मोठ्या नफ्याचे आमिष दाखवले जात असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.आमिषाने बोलावून ‘ड्रॉप केस’ची अंमलबजावणी व्हिडिओंना भुललेले लोक गावात पोहोचल्यावर त्यांना नकली नोटा, बनावट वस्तू किंवा खोट्या मौल्यवान वस्तू दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केली जाते. अनेक वेळा कोणतीही वस्तू न देता थेट पैसे हिसकावले जातात. विरोध करणाऱ्यांना मारहाण करून लुटले जाते.धक्कादायक बाब म्हणजे, काही प्रकरणांमध्ये पीडित व्यक्तींकडे बनावट हरणाचे किंवा वाघाचे कातडे ठेवून त्यांचे व्हिडिओ चित्रीत केले जातात. त्यानंतर “पोलिसांकडे गेलात तर वन्यजीव तस्करीच्या गुन्ह्यात अडकवू” अशी धमकी देऊन तक्रार करण्यापासून रोखले जाते. पोलिसांच्या भाषेत या प्रकारांना ‘ड्रॉप केस’ म्हणून ओळखले जाते.मागील तीन वर्षांत या परिसरात दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या चिंताजनक आहे.दरोडा – 10 ,खुनासह दरोडा – 1 ,खून – 1 ,जबरी चोरी – 7 ,फसवणूक – 16 ,दरोड्याचा प्रयत्न – 1 ,सरकारी नोकरावर हल्ला – 2 जळगाव पोलिसांचे “ऑपरेशन ड्रॉप केस “:या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जळगाव पोलिसांनी आज पहाटे मोठे ऑपरेशन ड्रॉप केस “ हे  विशेष अभियान राबविले. पहाटेच्या सुमारास प्रचंड मोठ्या प्रमाणात पोलिस अधिकारी, अंमलदार , आरसीपी यांनी प्लान करून एकाच वेळी या गावांमध्ये धाडसत्र राबवत संशयित आणि सराईत आरोपींना ताब्यात घेतले आहे आणि मोठ्या प्रमाणात मुडीमाल हस्तगत केला आहे कारवाई दरम्यान जप्त/हस्तगत मुद्देमाल रोख रक्कम – अंदाजे ₹20 लाख रुपये सोने – अंदाजे 300 ग्रॅम,चांदी – अंदाजे 2.5 कि.ग्रॅ. हरिणाच्या कातड्या – 02, चिल्ड्रन्स बँक करन्सी, कलर प्रिंटर,नागमणी, रुद्राक्ष, रेड मर्क्युरी बल्ब, सुलेमानी दगड, मोबाईल हँडसेट – 30 वाहने चारचाकी – 04 दुचाकी – 06 शस्त्रे :गावठी कट्टा – 01,चॉपर – 02 एकूण 55 रेकॉर्डवरील आरोपींना पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले असून त्यांच्यावर आवश्यक कायदेशीर कारवाई सुरू आहे.

Post a Comment

أحدث أقدم