चिखली :- सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सामाजिक कार्यकर्त्यामध्येच राडा होत असेल तर ते समाजाला काय संदेश देणार? असा प्रश्न उपस्थित करणारी घटना काल रात्री बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात घडली आहे.या दोन्ही समाज सेवकांचे नातेवाईक आणि समर्थकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षाने शहराचे वातावरण तणावपूर्ण झाले होते. उबेद अली खान उर्फ भाईजान आणि हाजी निसार सेठ कुरेशी या दोन प्रभावशाली व्यक्तींच्या गटांमध्ये काही काळापासून किरकोळ कारणावरून कुजबुज सुरू होती.याच वैमनस्याचा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळाले.यामध्ये अनेक लोकांचा सहभाग असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते,तर पोलिसांनी धाव घेत शांतता प्रस्थापित केली असली तरी भविष्यातील तणावाची शक्यता नाकारता येत नाही.या प्रकरणी रात्री उशिरा दोन्ही गटातील 10-10 जणाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती ठाणेदार संग्राम पाटील यांनी दिली आहे.
चिखली शहरात तुफान "राडा"सामाजिक कार्यकर्ते भाईजान व हाजी निसार गटांमध्ये जोरदार हाणामारी...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق