मलकापूर :- मोताळा - नांदुरा तालुक्याला लागलेला मुख्य रस्ता म्हणजेच टाकरखेड तालखेड रस्त्याची अवस्था म्हणजे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी झाली आहे हा रस्ता बऱ्याच गावातील लोकांसाठी मुख्य रस्ता आहे आज या रस्त्याची भयानक परिस्थिती झाली असून याकडे प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष करत आहे असेच दिसून येते या रस्त्याने मलकापूर जयपूर बस दिवसभर फेरी करत असते या रस्त्याची अवस्था म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळणे अशी झाली आहे रस्ता कुठच दिसत नाही पावसाच्या पाण्यामुळे पूर्ण रस्त्यात पाणी साचून मोठमोठाले खड्डे पडले आहे तरी प्रशासन डोळे झाकून आहे मलकापूर मोताळा शहरात जाण्यासाठी बऱ्याच गावातील लोकांचा हा मुख्य रस्ता असून शेलापूर फाटा ते तालखेड रस्ता आमदार संजू भाऊ गायकवाड यांनी अतिशय चांगल्या प्रकारे बनवला मात्र मलकापूर मतदार संघात येणारा तालखेड ते टाकरखेड या रस्त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे यामुळे प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे लोकांना जीवाशी खेळून या रस्त्याने प्रवास करावा लागतो बऱ्याच लोकांचे रस्त्याअभावी अपघात होतात
या रस्त्यासाठी उपाययोजना करून काम सुरू न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींचा निषेध करत रस्त्यातील खड्ड्यांमध्ये बेसरमचे झाड लाऊन आंदोलनाचा इशारा राष्ट्रीय बजरंग दल विदर्भ प्रांत मंत्री व नागरिकडून देण्यात आला आहे
إرسال تعليق