Hanuman Sena News

तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत यशोधाम पब्लिक स्कूल संघाचा दिमाखदार विजय...


मलकापूर : तालुकास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत यशोदाम पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज (YPS), मलकापूरच्या फुटबॉल संघाने उत्कृष्ट व दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.उपांत्य फेरीत YPS  School विरुद्ध SOS school यांच्यात झालेल्या सामन्यात YPS संघाने आक्रमक व उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत 2–0 असा दणदणीत विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला.अंतिम सामन्यात YPS  School विरुद्ध MSM School यांच्यात अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. दोन्ही संघांनी शेवटपर्यंत उत्कृष्ट खेळ करत सामना 4–4 असा बरोबरीत राखला. त्यानंतर निकालासाठी घेण्यात आलेल्या पेनल्टी शूटआऊटमध्ये YPS संघाने 3–1 असा विजय मिळवत तालुकास्तरीय स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे विजेतेपद पटकावले.YPS संघाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे संचालक डॉ. वैभव महाजन सर आणि प्राचार्या पी. उषा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले.यावेळी क्रीडा शिक्षक विनायक क्षिरसागर,पल्लवी ठाकूर आणि धीरज वाकोडे यांनी विजेत्या खेळाडूंचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

أحدث أقدم