Hanuman Sena News

मलकापूर तालुक्यात वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्याची मागणी; धर्मवीर युथ फाऊंडेशन...





मलकापूर : मलकापूर तालुक्यातील विविध ग्रामीण भागात अलीकडच्या काळात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिक व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.घरफोडी, शेती साहित्य, विद्युत तारा, मोटारपंप, दुचाकी तसेच इतर मौल्यवान वस्तूंच्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी धर्मवीर युथ फाउंडेशन, मलकापूर तालुका यांच्या वतीने मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले.धर्मवीर युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भैया गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन पोलिस प्रशासनाकडे सादर करण्यात आले.निवेदनात मलकापूर तालुक्यातील ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढविण्यात यावी, चोरीच्या घटनांच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या ठिकाणी नियमित नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात यावी, तसेच मागील चोरीच्या प्रकरणांचा तातडीने तपास करून आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.तसेच ज्या गावांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, त्या ठिकाणी विशेष पोलिस पथकाची गस्त वाढवावी, सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध असलेल्या ठिकाणचे फुटेज तपासून चोरीच्या घटनांचा छडा लावावा, नागरिकांकडून मिळणारी माहिती व तक्रारी गोपनीय ठेवून त्यावर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.भविष्यात चोरीच्या घटना घडू नयेत यासाठी पोलिस प्रशासन आणि ग्रामस्थांच्या समन्वयातून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात याव्यात. तसेच ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी आणि त्यांच्या मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासनाने प्रभावी उपाययोजना करून नागरिकांना सुरक्षिततेचा विश्वास द्यावा, अशी अपेक्षा फाउंडेशनच्या वतीने व्यक्त करण्यात आली.यावेळी धर्मवीर युथ फाउंडेशनचे तालुका प्रमुख देवा बावस्कार, तालुका उपप्रमुख मंगेश गव्हाळे, तालुका संपर्कप्रमुख निखिल पाटील, सचिन गर्दळ, गणेश मुंडे, शिवाजी धोराडे, राम बागल, सागर पाटील, विशेष भगत, रमेश बावस्कर, विवेक गोरावे, घिरन महाजन, रविंद्र पाटील, यश बावस्कार, शुभम शिर्के, छोटू दामहारे, अभितोधन खारसने, विलास शेष्ठले, सुरज तांगळे यांच्यासह धर्मवीर युथ फाउंडेशन मलकापूर तालुक्यातील पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.दरम्यान, वरील मागण्यांवर तातडीने आणि प्रभावी कार्यवाही न झाल्यास धर्मवीर युथ फाउंडेशनच्या वतीने लोकशाही व कायदेशीर मार्गाने आंदोलन, निवेदन तसेच जनआंदोलन करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाला देण्यात आला आहे.हे निवेदन कोणत्याही व्यक्तीविरुद्ध वैयक्तिक द्वेषातून नसून शेतकरी, नागरिक आणि ग्रामीण भागातील जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने देण्यात आले असल्याचे फाउंडेशनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे पोलिस प्रशासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

Post a Comment

أحدث أقدم