मलकापूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा व वेटलिफ्टिंग जिल्हा संघटना, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने दाताळा येथे दि. ९ व १० सप्टेंबर रोजी आयोजित जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत ली. भो. चांडक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत ८ सुवर्ण, २ रजत आणि २ कांस्य अशी एकूण १२ पदके पटकावली. यामधून खेळाडूंची पुढील विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध विद्यालयांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. चांडक विद्यालयाच्या मुला-मुलींनी १७ व १९ वर्षे वयोगटातील विविध वजनगटांत उत्कृष्ट कामगिरी करत विद्यालयाचा नावलौकिक वाढविला. १७ वर्षांखालील मुलींमध्ये समीक्षा भगत हिने ७९ किलो वजनगटात सुवर्णपदक, तर अक्षरा भगत हिने ५९ किलो वजनगटात रजतपदक पटकावले. १९ वर्षांखालील मुलींमध्ये प्राची श्याम बगाडे हिने ५५ किलो, तर गोकुळा प्रमोद ताठे हिने ६३ किलो वजनगटात सुवर्णपदक मिळविले. साक्षी बावस्कर हिने ४८ किलो वजनगटात कांस्यपदक पटकावले. १७ वर्षांखालील मुलांमध्ये रुद्र संदीप पाटील याने ५६ किलो, नैतिक बोंडे याने ६० किलो, रुद्र मेटांगे याने ७१ किलो, तर राजरत्न शांताराम मोरे याने ८८ किलो वजनगटात सुवर्णपदक मिळविले. समर्थ घोराडे याने ७१ किलो वजनगटात कांस्यपदक पटकावले. १९ वर्षांखालील मुलांमध्ये मोहित गोकुळ रानवे याने ७१ किलो वजनगटात सुवर्णपदक, तर ओम घोराडे याने ६० किलो वजनगटात रजतपदक मिळविले.या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे संचालक मंडळ, प्राचार्य निवृत्ती निंबोळे, उपप्राचार्य संजयसिंग तोमर, पर्यवेक्षक बोंबटकर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. खेळाडूंना यश मिळवून देण्यासाठी क्रीडा शिक्षक सुहास वराडे, विक्रांत नवले व नवनीत तेजेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. चांडक विद्यालयाच्या या दमदार कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
वेटलिफ्टिंगमध्ये चांडक विद्यालयाची दमदार कामगिरी ; ८ सुवर्ण पदकांसह मिळविली १२ पदके..
Hanuman Sena News
0
إرسال تعليق