Hanuman Sena News

नांदुरा खुर्द येथे मच्छिंद्रनाथ सार्वजनिक कावड यात्रा अतिउत्साहात संपन्न; छत्रपती संभाजी महाराजांचा देखावा ठरला मुख्य आकर्षण...



​नांदुरा (प्रतिनिधी):
नांदुरा खुर्द येथे सोमवारी (दि. २४ ऑगस्ट) 'मच्छिंद्रनाथ सार्वजनिक कावड यात्रा' अत्यंत शिस्तबद्ध, भव्य दिव्य आणि अभूतपूर्व उत्साहात पार पडली. मच्छिंद्रनाथ सार्वजनिक कावड यात्रा समितीचे अध्यक्ष संजूभाऊ मात्रे यांनी सर्व समिती सदस्यांना व समस्त ग्रामस्थांना विश्वासात घेऊन योग्य नियोजनाच्या बळावर ही कावड यात्रा यशस्वीरीत्या पार पाडली.कावड यात्रेच्या यशस्वीतेसाठी नांदुरा खुर्दसह परिसरातील शिवभक्तांनी सढळ हाताने आर्थिक व अन्न-पाण्याची मदत केली. यात्रेदरम्यान गावातील प्रत्येक गल्लीत व मुख्य रस्त्यांवर ग्रामस्थांनी पाण्याचा शिडकाव करून सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या. ठिकठिकाणी कावडधारकांवर फुलांचा वर्षाव करून भक्तिमय वातावरणात त्यांचे स्वागत करण्यात आले.​या कावड यात्रेमध्ये साकारलेला 'छत्रपती संभाजी महाराज' यांचा जिवंत देखावा, तसेच साक्षात् श्री शंकर महादेव आणि नवनाथ सिद्ध श्री मच्छिंद्रनाथ महाराजांची देखणी मूर्ती यांचा भव्य देखावा नागरिकांचे मुख्य आकर्षण ठरला. हा नयनरम्य देखावा पाहण्यासाठी रस्त्यांवर अभूतपूर्व गर्दी झाली होती.​या सोहळ्यात पप्पू भाऊ बावस्कार यांची कडकडती आणि रोमहर्षक शिवगर्जना विशेष लक्षवेधी ठरली! त्यांनी जेव्हा आपल्या बुलंद आवाजात शिवगर्जना केली, तेव्हा उपस्थित हजारो शिवप्रेमींच्या अंगावर काटा आला.​कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नांदुरा पोलीस स्टेशनच्या प्रशासनाने उत्तम सहकार्य केले. संजूभाऊ मात्रे यांचे नेतृत्व, समिती सदस्यांची अहोरात्र मेहनत, तरुणांचा उत्साह आणि समस्त गावकरी मंडळींच्या सहकार्यामुळे यंदाची मच्छिंद्रनाथ कावड यात्रा नांदुरा खुर्दच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवली गेली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post