मलकापूर : मलकापूर शहरातील भाजपाच्या अंतर्गत राजकारणाबाबत सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत एका उमेदवाराला मतपेटीतून मतदान करून निवडून आणल्यानंतर त्याच उमेदवाराच्या विरोधात जाहीर निवेदन देऊन समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आला. विशेष म्हणजे, निवडून आलेल्या उमेदवाराला शुभेच्छा देण्यासाठी याच मंडळींपैकी काही जण आघाडीवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या परस्परविरोधी भूमिकांमागे नेमके कारण काय, असा सवाल उपस्थित होत आहे.या संपूर्ण प्रकारामुळे मलकापूर भाजपामध्ये अंतर्गत मतभेद आहेत का, याबाबत चर्चा रंगली आहे. पक्षात एक गट आमदार चैनसुख संचेती यांना मानणारा, तर दुसरा गट शिवाभाऊ तायडे यांना मानणारा असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतरच्या भूमिकांमध्ये दिसून येणारा विरोधाभास नेमका कशामुळे निर्माण झाला? ऐनवेळी भाजपाच्याच उमेदवाराची पेटी बंद का करण्यात आली विरोधी असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा का?कोणाच्या सांगण्यावरून हे राजकीय ‘थोतांड’ सुरू आहे? याबाबत कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत.दरम्यान, मलकापूर भाजपातील या कथित अंतर्गत संघर्षाकडे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी लक्ष देऊन वस्तुस्थिती जाणून घ्यावी आणि कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आगामी काळात पक्षातील दोन्ही गटांमध्ये समन्वय साधला जातो की हा अंतर्गत संघर्ष आणखी तीव्र होतो, याकडे मलकापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
मलकापूर भाजपात अंतर्गत मतभेद? दोन गटांमुळे राजकीय चर्चेला उधाण...
Hanuman Sena News
0
Post a Comment