मलकापूर : धर्मवीर युथ फाउंडेशन, महाराष्ट्र राज्याच्या वतीने लोणवाडी (ता. मलकापूर, जि. बुलढाणा) येथील श्री. देवा बाबस्कर यांची मलकापूर तालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड यांनी ही नियुक्ती जाहीर केली असून, नियुक्तीच्या वेळी जिल्हा अध्यक्ष ओम टप उपस्थित होते.धर्मवीर युथ फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य, युवकांचे संघटन, जनजागृती तसेच समाजामध्ये राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होऊन धर्म, राष्ट्र आणि हिंदू संस्कृतीच्या संरक्षणासाठी कार्य करण्याचा संस्थेचा उद्देश आहे.देवा बाबस्कर यांच्यावर मलकापूर तालुका प्रमुखपदाची जबाबदारी सोपविताना संघटनेचे कार्य तालुक्यात अधिक व्यापक करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. सामाजिक जनजागृती, संघटन बळकटीकरण, युवकांना संघटित करणे तसेच युवकांमध्ये राष्ट्रभक्ती, धर्मनिष्ठा आणि स्वाभिमानाची भावना जागृत करण्यासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.तालुक्यातील विविध गावांमध्ये संघटनेचे कार्य पोहोचविण्यासोबतच युवकांना सामाजिक कार्याशी जोडणे, समाजोपयोगी उपक्रमांना चालना देणे आणि गरजू घटकांसाठी विविध उपक्रम राबविण्याचा मानस देवा बाबस्कर यांनी व्यक्त केला. संघटनेने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून समाजहितासाठी कार्य करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.देवा बाबस्कर यांच्या नियुक्तीबद्दल मलकापूर तालुक्यासह परिसरातील विविध सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मित्रपरिवाराकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली धर्मवीर युथ फाउंडेशनचे कार्य मलकापूर तालुक्यात अधिक प्रभावीपणे विस्तारेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
धर्मवीर युथ फाउंडेशनच्या मलकापूर तालुका प्रमुखपदी देवा बाबस्कर यांची नियुक्ती...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق