मलकापूर, दि. २४ जुलै : महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मलकापूर शहर व तालुक्याच्या वतीने आज शुक्रवार, दि. २४ जुलै २०२६ रोजी दसरखेड़ एमआयडीसी पोलीस स्टेशन परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध प्रकारच्या सावली, फळझाडे आणि पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली.यावेळी उपस्थितांनी वृक्षारोपण ही केवळ औपचारिकता नसून प्रत्येक नागरिकाने आपल्या आयुष्यात किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे मत व्यक्त केले. वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि पर्यावरणीय असमतोल लक्षात घेता अशा उपक्रमांची गरज अधिक असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण संवर्धनासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी उपस्थित सर्वांनी लावलेल्या वृक्षांचे नियमित संगोपन करून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प केला.या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मलकापूर शहर व तालुक्याचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते तसेच दसरखेड़ एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्वांच्या सहभागामुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मलकापूर शहर व तालुक्याच्या वतीने आगामी काळातही सामाजिक, पर्यावरणपूरक व जनहिताचे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दसरखेड़ एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे वृक्षारोपणाचा सामाजिक उपक्रम..
Hanuman Sena News
0
إرسال تعليق