मलकापूर : आदर्श प्राथमिक विद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव दि.30 जून रोजी साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत आले होते. कार्यक्रमात सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, विद्यार्थ्यांनी गाणी नृत्य आणि विविध कला गुण सादर करून उपस्थितांची मन जिंकली त्यांचे माता पालकांनी पूजन केले. विद्यार्थ्यांची वाजत गाजत गावातून मिरवणूक काढण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांच्या आवडीचे कार्टून गोरिला व तात्या विंचू यांच्यासोबत विद्यार्थ्यांनी धमाल मस्ती केली. विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक घोटी सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना गोड पदार्थ वाटप करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री विजय चव्हाण सरांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी शिस्त मेहनत आणि प्रामाणिकपणा जपून शिक्षण घ्यावे असे आवाहन केले.कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला संपूर्ण कार्यक्रम आनंदी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला तसेच सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी परिश्रम घेतले.
आदर्श प्राथमिक विद्यालय मलकापूर ; विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत....
Hanuman Sena News
0
Post a Comment