Hanuman Sena News

मलकापूर येथील आदर्श विद्यालयाच्या सौ. भाग्यश्री चिमणपुरे यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड...


मलकापूर प्रतिनिधी 

मलकापूर:- महाराष्ट्र शासनामार्फत राज्यातील शिक्षक तसेच अधिकारी–कर्मचारी यांच्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांअंतर्गत घेण्यात आलेल्या शब्दकोडे निर्मिती स्पर्धेत नगर सेवा समिती द्वारा संचालित आदर्श विद्यालय, मलकापूर येथील उपक्रमशील उपशिक्षिका सौ. भाग्यश्री मनोज चिमणपुरे यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.यवतमाळ येथे नुकत्याच पार पडलेल्या विभागीय स्तरावरील शब्दकोडे निर्मिती स्पर्धेत सौ. चिमणपुरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांची जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET), धुळे येथे आयोजित होणाऱ्या राज्यस्तरीय शब्दकोडे निर्मिती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.सौ. चिमणपुरे मॅडम या नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शिक्षिका म्हणून परिचित आहेत. त्यांनी मागील तीन वर्षांच्या कालावधीत दोन वेळा राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात आपले शैक्षणिक साहित्य सादर करून आपल्या गुणवत्ता व सर्जनशीलतेचा ठसा उमटवला आहे.त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे समस्त संचालक मंडळ, शाळेचे मुख्याध्यापक श्री. चव्हाण सर, तसेच सर्व शिक्षकवृंद व पालकवर्ग यांनी सौ. चिमणपुरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.सौ. चिमणपुरे यांच्या या यशामुळे आदर्श विद्यालय, मलकापूरच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी भर पडली असून, इतर शिक्षक व विद्यार्थ्यांनाही निश्चितच प्रेरणा मिळाली आहे

Post a Comment

أحدث أقدم