Hanuman Sena News

गवळी समाज दिनदर्शिका २०२६' चा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न...



मलकापूर: महाराष्ट्र राज्य गवळी समाज संघटना 549 जिल्हा शाखा बुलढाणा या गवळी समाज संघटनेतर्फे गवळी समाज दिनदर्शिका 2026 प्रकाशन व वितरण तसेच गवळी समाज संघटना नवनियुक्त जिल्हा व तालुकास्तरीय पदाधिकारी यांचे प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम दिनांक 28/12/2025 रोजी मोताळा तालुक्यातील पान्हेरा खेडी या गावी श्रीकृष्ण मंदिराच्या सांस्कृतिक सभागृहामध्ये हा कार्यक्रम पार पडला.गवळी समाज संघटनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष प्रमोद वसंतराव किन्होळकर, युवा अध्यक्ष प्रवीण वैराळकर,जिल्हा विधी सल्लागार ॲड.श्याम गाळणे, किन्होळकर प्रिंटिंग चे संचालक प्रविण किन्होळकर यांच्या संकल्पनेतून गवळी समाज दिनदर्शिका 2026 चा उपक्रम राबविण्यात आला.प्रकाशन समारंभ, नियोजन नवनियुक्त जिल्हा सचिव विनय वैराळकर सर मोताळा तालुका अध्यक्ष गजानन गार्वे यांनी तसेच गावातील समाज बांधवांना सोबत घेऊन अतिशय सुंदरपणे पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजातील ज्येष्ठ शिक्षक वामनराव गार्वे यांनी भूषवले. तर मंचावर समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक व सल्लागार उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल किन्होळकर सर तर आभार प्रदर्शन सुभाष किन्होळकर सर यांनी केले.अध्यक्षीय भाषणात बोलताना श्री.प्रमोद किन्होळकर म्हणाले की, "आजच्या डिजिटल युगातही घराघरात भिंतीवरच्या दिनदर्शिकेचे महत्त्व टिकून आहे. पुढे बोलताना ते म्हणाले असेच अभिनव उपक्रम राबवून युवकांनी स्वयंप्रेरणेने समाज सेवा करावी,जेणेकरून समाजात एकोपा निर्माण होऊन संघटना अधिक मजबूत बनेल."कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील वैराळकर,प्रमोद पिसे पाटील,अमर कुळे,पंडितराव किन्होळकर राजेंद्र वैराळकर,अरुण गवळी,भानुदास किन्होळकर,उत्तमराव वैराळकर,शिवाजी गाळणे,शालिग्राम इंगोले,डी.एन पाटील,संतोष वैराळकर,सुभाष वैराळकर सर,धनराज इंगोले,अशोक किन्होळकर,सुधाकर किन्होळकर,विनोद जनार्दन किन्होळकर,रामशंकर बावस्कर,अतुल वैराळकर,शुभम किन्होळकर,अर्जुन महाजन,रामभाऊ गाळणे,वैभव घोडेकर,यांनी प्रयत्न केले.या दिनदर्शिकेचे वैशिष्ट्य सांगताना कार्यक्रमाचे सूत्रसंचालक श्री.हर्षल किन्होळकर सर यांनी भारतीय संस्कृती, सण उत्सव पुण्यतिथी,जयंती या विषयांचा समावेश प्रस्तुत दिनदर्शिकेत करण्यात आला आहे असे सांगितले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी समाजातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ समाज बांधवांनी तसेच युवकांनी कष्ट घेतले,या सोहळ्याला समाजातील अनेक मान्यवर, वाचक आणि नागरिक,युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांना स्नेहभोजन देऊन आनंद द्विगुणित करण्यात आला.

Post a Comment

أحدث أقدم