सातारा:- साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र आत्महत्येमागे सातारा पोलीस दलातील एक पोलीस उपनिरीक्षक आणि एक पोलीस कर्मचारी असल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.डॉक्टर तरुणीने काल रात्री हे टोकाचे पाऊल उचलले.तिच्या आत्महत्येमागे पोलिसांशी झालेला वाद आणि त्यानंतर सातारा इथे कार्यरत असलेल्या पीडित महिला डॉक्टरविरोधात सुरू असलेली चौकशी हे एक कारण मानले जात आहे. मात्र, या घटनेबाबत अधिक गंभीर माहिती समोर आली आहे.हातावर लिहिली 'सुसाईड नोट' डॉक्टर तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या हातावर सुसाईड नोट लिहिली होती.या चिठ्ठीत तिने दोन व्यक्तींचा थेट उल्लेख करून त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.PSI गोपाल बदने यांनी याने माझ्यावर चार वेळा बलात्कार केला. तर पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर याने मानसिक त्रास दिला, असा उल्लेखही त्यांनी केला आहे. अत्यंत गंभीर आरोपांमुळे, ही आत्महत्या केवळ मानसिक तणावातून केलेली नसून, त्यामागे लैंगिक अत्याचार आणि छळ असल्याचे स्पष्ट होत आहे.पोलीस आणि आरोग्य विभागातील वादाचे कारण तरुणी काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातील वादामध्ये अडकली होती. वैद्यकीय तपासणीसंदर्भात पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्यांच्यावर चौकशी सुरू होती, अशीही माहिती समोर येत आहे. आपल्याला अन्याय होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती. "माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन," अशी तक्रार त्यांनी यापूर्वी आपल्या वरिष्ठांकडे केली होती. मात्र तरुणीच्या आत्महत्येचं नेमकं कारण काय याचा पोलीस तपास करत आहेत.
डॉक्टर तरुणीवर चार वेळा बलात्कार पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप करत डॉक्टर तरुणीची आत्महत्या...
Hanuman Sena News
0
Post a Comment