मलकापूर:- स्थानिक आदर्श प्राथमिक विद्यालय मलकापूर येथे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.सर्वप्रथम माता सरस्वती व डॉ. ए. पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आदर्श इंग्लिश मिडीयम च्या मुख्याध्यापिका सौ. सारीका तायडे मॅडम, प्रमुख पाहुणे ( नगर सेवा समितीचे ) संचालक संजयजी चांडक,, शाळेचे मुख्याध्यापक श्री विजय चव्हाण सर तसेच शाळेतील शिक्षिका रंजना पाटील मॅडम ह्या उपस्थित होत्या.याप्रसंगी विद्यार्थ्यांनी डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकणारी सुंदर भाषणे सादर केली. तसेच वर्ग 4 था ब मधील विद्यार्थी गणेश शेकोकार याने डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांची वेशभूषा साकारली. डॉ. कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून इयत्ता 4 थी च्या विद्यार्थ्यांनी डॉ. कलाम साहेब यांच्या जीवनचरित्रा वर आधारित सुंदरअसे नृत्य सादर केले .प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात शिक्षणात वाचनाचे किती महत्व आहे व कलाम साहेबांचे वाक्य वाचाल तर वाचाल हे मुलांना पटवून सांगितले. आज सर्व मुलांनी वेगवेगळी पुस्तके वाचून मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम साहेबांना विनम्र अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रामेकर मॅडम तसेच आभार प्रदर्शन विनोद इंगळे सर यांनी केले.इयत्ता 4थी च्या विद्यार्थ्यांच्या नृत्याची तयारी सौ. रामेकर मॅडम यांनी करून घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.विजय चव्हाण सर तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका यांनी परिश्रम घेतले.
आदर्श प्राथमिक विद्यालयात डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम जयंती तसेच वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा...
Hanuman Sena News
0
Post a Comment