Hanuman Sena News

भीमगर्जना कार्यालय उद्घाटन प्रसंगी, भाई अशांत वानखेडे यांची साखरतुला


मलकापूर:- ज्येष्ठ सामाजिक नेते भाई अशांत वानखेडे यांच्या वाढदिवसा निमित्त व भीमगर्जना मुख्य कार्यालयाचे उद्घाटनाच्या औचित्य साधून भाई अशांत वानखेडे यांची साखर तुला करण्यात आली.मलकापूर येथील स्टेशन रोडवरील भीमगर्जनाचे नव्याने सुरू झालेल्या कार्यालयाचे उद्घाटन भाई अशांत वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले असून याच वेळी त्यांच्या वाढदिवसाचे निमित्त साखर तुला करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलाने करण्यात आली भीमगर्जना चे नव्याने सुरू झालेले कार्यालयाचे फीत कापून भाई अशांत वानखेडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्य अतिथी म्हणून भाई अशांत वानखेडे अध्यक्ष समतेचे निळे वादळ, धनश्रीताई काटीकर पाटील हिंदी मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र अध्यक्ष, प्रा प्रकाश थाटे राष्ट्रीय अध्यक्ष लाईव्ह, अशोक सुरडकर महाराष्ट्र प्रमुख भीमगर्जना, अजय टप विदर्भ संघटक हिंदी मराठी पत्रकार संघ, दामोदर शर्मा शेतकरी नेते, विजयजी डागा , श्रीकृष्ण तायडे जिल्हाध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघ, सतीश दांडगे विदर्भ सचिव हिंदी मराठी पत्रकार संघ, सुधाकर तायडे तालुका अध्यक्ष, रवी वाकोडे, बळीराम बावस्कार, नथूजि हिवराळे, शेख निसार , मयूर लड्डा, अनिल गोटी, आत्माराम मोरे, प्रा. विजय तायडे, रवी बाभुळकर, मुन्ना रायपुर, दिलीप इंगळे , ऋषिकेश तेजेकर , मंगेश मेढे, रवी दाभाडकर हे उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post