स्थानिक मलकापूर येथील आदर्श प्राथमिक विद्यालय येथे आज दिनांक 6 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री संजयजी चांडक (संचालक, नगरसेवा समिती मलकापूर,) लाभले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मलकापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा.एन जे फाळके साहेब, शाळेचे माजी शिक्षक श्री आशिष तांदुळे सर तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. विजय चव्हाण सर उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकणारी सुंदर भाषणे तसेच नृत्य, गिते सादर केली. वर्ग 4 था ब मधील शिवम पोफळणारे याने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांची वेशभूषा साकारली.मा.फाळके साहेब यांनी आपण आयुष्यभर विद्यार्थी असलो पाहिजे तसेच जे जे काही नवीन शिकता येईल ते आपण शिकून आपली आपली प्रगती केली पाहिजे. शिक्षण हेच आपल्या प्रगतीचे खरा गुरुमंत्र आहे असे मत विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केले. प्रमुख पाहुणे श्री आशिष तांदूळे सर यांनी सुद्धा स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर कठीण परिश्रम करा आणि यशाचे शिखर सर करा असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन शाळेतील शिक्षिका कु. कोलते मॅडम यांनी केले. व आभार प्रदर्शन नितीन महाजन सर यांनी केले.तसेच कार्यक्रमाची सांगता ही वंदे मातरम या गीताने करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वी ततेसाठी शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
आदर्श प्राथमिक विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा.....
Hanuman Sena News
0
إرسال تعليق