मलकापूर : सज्जनशक्ती जेवढी जास्त वाढेल तेवढे दुर्जन कमी होतील. छत्रपती शिवाजी महाराज यांनी दुर्जनांचा नायनाट करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. सज्जन शक्तीचा दुर्जनांवर मिळवलेला विजय म्हणजेच विजयादशमी होय. असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक मा .दीपकजी तामशेट्टीवार यांनी आयोजित विजयादशमी व शस्त्र पूजन उत्सव प्रसंगी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तारखे नुसार स्थापन दिवस तथा विजयादशमी निमित्ताने शस्त्र पूजन व विजयादशमी उत्सवाचे आयोजन दिनांक २७ सप्टेंबर रोजी प.पू.डॉ. हेडगेवार सभागृह च्या समोरील मैदानात करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून शहरातील प्रसिद्ध उद्योजक संतोषजी बोरगावकर हे होते. तर मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा. प्रांत संघचालक दीपकजी तामशेट्टीवार यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी विभाग संघचालक मा.चित्तरंजनजी राठी, ता. संघचालक मा.ज्ञानदेवजी पाटील, नगर संघचालक मा.दामोदर जी लखाणी, नगर सह संघचालक मा .राजेश जी महाजन यांची उपस्थिती लाभली.याप्रसंगी सायंकाळी ४.३० वाजता शहरातील मुख्य मार्गावर स्वयंसेवकांचे पथसंचलन काढण्यात आले. यावेळी पाऊस सुरू असताना सुद्धा स्वयंसेवकांची उपस्थिती मोठ्या स्वरूपात होती. त्यामुळे शहरात पथसंचलन आकर्षण ठरले. त्यानंतर प.पू. डॉ.हेडगेवार सभागृह येथे पथसंंचालनाचा समारोप झाला .सायंकाळी ६.३० वाजता शस्त्र पूजन तथा विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी नगर संघ चालक मा .दामोदरजी लखानी यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत संघ कार्याबद्दल माहिती दिली. तर प्रमुख उपस्थिती संतोषजी बोरगावकर यांनी संघ स्थापना व त्याचे उद्देश आपल्या विशेष शैलीत समजावून सांगितले.दरम्यान उपस्थित मातृशक्ती , नागरीक व स्वयंसेवकांना उद्बोधन करताना प्रमुख वक्ते दीपकजी तामशेट्टीवार म्हणाले की, उत्कृष्ट समाज घडविणे तथा प्रत्येकात कर्तव्याची जाण उत्पन्न करण्याचे कार्य म्हणजे संघाचे कार्य आहे. राष्ट्र उभारणीच्या कार्यात प्रत्येकाने सक्रिय असायला हवे. सुरुवातीपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एकच लक्ष्य आहे ते म्हणजे भारत समर्थ सशक्त व वैभवशाली कसा होईल. त्या उद्देशातूनच प्रत्येक कार्य होत आहे. परम पूजनीय डॉक्टरांनी स्वतःला राष्ट्रासाठी समर्पित करून या कार्याची सुरुवात करून समर्थ सशक्त व वैभवशाली राष्ट्र होण्याकरिता प्रयत्नशील वाटचाल केली. पुरुषांसोबतच मातृशक्तीचे सुद्धा संघटन असावे याकरिता १९३६ पासून राष्ट्रसेविका समीती ही संघटना कार्यरत आहे. कुटुंब प्रबोधन, समरसता, पर्यावरण, स्व जागरण, नागरिक कर्तव्य या पंचसूत्री वर प्रत्येक स्वयंसेवक कार्य करण्यासाठी प्रयत्नशील आहे. प्रत्येक व्यक्ती तसेच घराघरातून संस्कृतीचे कार्य होणे गरजेचे आहे व त्यातूनच देशभक्ती व प्रगत राष्ट्र निर्माण होऊ शकेल असे उद्बोधन केले.आयोजित कार्यक्रमाचे संचलन नगर सहकार्यवाह संजयसिंह तोमर यांनी केले. मुख्यशिक्षक म्हणून शाम उप्पल तर सांघिक गीत विजय अंबुसकर, सुभाषित आशिष महाजन,अमृतवचन राम सदावर्ते, वैयक्तिक गीत धीरज वैष्णव यांनी सादर केले. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक तथा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सज्जनशक्तीचा दुर्जनांवर मिळवलेला विजय म्हणजेच विजयादशमी - मा . दीपकजी तामशेट्टीवार...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق