मलकापूर तालुक्यातील बेलाड येथे म्हनुभव पंथाकडून देवाला पोविते वाहण्याची परंपरा कायम ठेवत शेकडो अनुयाकडून पोवीत्यांचा कार्यक्रम संपन्न झाला. स्वामींमी ज्या प्रमाणे बीड स्थानी भक्त जनाच्या पवित्याचा स्वीकार केला तसा माझ्या पवित्याचा स्वीकार किजोजी स्वामींराया.पवीते प्रमाणे माझे सर्वस्व जीवन तुझला समर्पित केले आहे व करत आहे.पवीते वाहताना नारळ दोरा सुपारी या वस्तु प्रामुख्याने लागतात मग नारळ हे जीव स्वरूपाचे प्रतीेक आहे दोरा हा जीवाच्या कर्म माळीकेचे प्रतीक आहे.सुपारी हे मनोधर्म,जीव धर्माचे प्रतीक आहे.परमेश्र्वराला आपले स्वर्वस्वच समर्पण करणे हे पविते वाहण्याचा भाव आहे.गोविंद हा शब्द मुख्यत्वे बोलल्या जातो तर गोविंद शब्दाचा अर्थ आहे,प्राप्त करून देणारा पूथ्वीवर ईद्रियावर विजय प्राप्त करून देनारा भवसागरातुन मुक्त करनारा हे कधी होनार ज्या वेळेस आपण आपले सर्वस्व जीवनच परमेश्र्वराला समर्पित करू तेव्हा.पवित्याला प्रमुख्याने कोणता रंगाचा धागा बांधावा व का पवीत्याला पांढरा रंगाचा धागा बांधावा कारण जीव स्वरूप हे स्पटीकासारखे पांढरे आहे व दोरा हा जीवाच्या कर्म मालीकेचे प्रतिक आहे,म्हनुन पांढरा धागा बांधावा तसेच पांढरा हा अहिंसेचे प्रतिक आहे व जाणवे ही पांढरेच बांधावे ,रंगीबेरंगी जे धागे लावले जातात त्या आपल्या भावना होय.जस आपण देवाला पविते वाहिले तसे आपल्या गुरूंना देखील पविते वाहून त्यांचं आपल्या यथाशक्ती पूर्वक पूजन करावे.गुरूंचे पूजन हे कमीतकमी वर्षातून एकदा तरी आपल्या हातुन झाले पाहिजे.गुरू ही आपली कुपकाटी व ज्ञानाचा सागर आहे.यावेळी शेकडो महिला व उपदेशी पुरुष उपस्थित होते.
महानुभव पंथा कडून पवित्र श्रावण महिन्यात पोविते देवाला अर्पण करून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या नावाचा गजर...
Hanuman Sena News
0
Post a Comment