(कार्यालय प्रतिनिधी)
मलकापूर:- रक्षाबंधन निमित्य विश्व हिन्दू परिषद दुर्गा वाहिनी मलकापूर तर्फे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना रक्षाबंधन निमित्त मलकापूर शहर पोलिस स्टेशन येथे पोहोचून राखी बांधण्यात आल्या या मागील उद्देश पोलीस प्रशासन मुळे समाजातील महिला मुली सुरक्षित आहे बहीण भावाच्या विश्वास प्रेमाचे रक्षणाचे प्रतीक आहे भावाने बहिणीला दिलेला विश्वासाचे प्रतीक म्हणजे रक्षाबंधन सर्व पोलिस बंधू यांना ही बहिणी आहेत आणि त्यांची ही खूप इच्छा असते राखी निमित्त आपल्या बहीणी कडे जायची पण आपण सर्व सामान्य व्यक्ती यांची सुरक्षा तसेच आपले सर्वांचे सर्व उत्सव शांती व आनंदी जाण्या करिता ते सणासुदीला ही दिवशी ड्युटी करावी लागते व ते आपल्या आपल्या बहिणी कडे जाऊ शकत नाही त्यांना त्यांची बहिणीची उणीव भासावी या दृष्टिकोनातून दुर्गावाहीनी हा उत्सव पोलीस बांधवांना राखी बांधून साजरा करण्यात आला जेव्हा दुर्गा यांनी पोलीसांच्या हाताला राखी बांधली त्या नंतर त्यांच्या मनात चेहऱ्यावर आनंद दिसून आला व त्यांच्या चेहऱ्या वरील हास्य तेज बघून खरोखरच सर्व दुर्गा वाहिनी भगिनींचे मन प्रसन्न झाले सर्व पोलिस बांधवांचे मन भरून आले आणि त्यांनी दुर्गावाणीच्या पदाधिकारी यांचे आभार मानले.
*चौकट -* रक्षाबंधन निमित्त मलकापूर शहरातील मुलींचे पाठलाग करून टाँटिंग आणि टवाळखोरी करणाऱ्या मुलांच्या बंदोबस्त करिता आपल्या पोलीस बांधवांना दामिनी पथक सुरू करण्या बाबत विनंती करण्यात आली तेव्हा त्यांनी महाराष्ट्र शासना द्वारे 112 हा टोल फ्री क्रमांक विजय महिला साह्य करता 24 तास सुरू करण्यात आलेला आहे अशी ए.पी.आय गजाननजी कोळसे यांनी दिली.ज्याही मुलींना असे कोणी खोडकर मुले छेडत असल्यास, पाठलाग करतात तेव्हा त्वरित 112 या नंबर डायल करावा पाच मिनिट मध्ये पोलीस बंधू भगिनी यांच्या सहायता करता उपस्थित होतील अशी बहुमूल्य माहिती दिली आहे सर्व मुलींनी हा नंबर आपल्या फोनमध्ये सुरक्षित करून आवश्यकता पडल्यास याचा निश्चित उपयोग करावा असे आवाहन कु.पायल राजपूत दुर्गावाहिनी जिल्हा सहसंयोजिका यांनी केले
Post a Comment