प्रतिनिधी
राहुल संबारे
मलकापूर:- मौजे बेलाड येथील श्रीमती सत्यभामा बाबुराव संबारे यांनी मलकापूर खापरखेड शेत शिवारात असलेल्या शेत जमिनीवर सोलार कृषी पंप बसविण्याबाबत सी आर आय या कंपनीकडून विलंब होत असल्याचे पत्र माननीय तहसीलदार साहेब तथा विद्युत वितरण चे कार्यकारी अभियंता यांना दिले असून विलंबाच्या कारणाबाबत लेखी स्वरूपात माहिती मागवली आहे त्याचबरोबर आतापर्यंत कंपनीच्या माध्यमातून झालेल्या नुकसानाची भरपाई देखील मागितलेली आहे. अर्जात नमूद केल्याप्रमाणे मी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये सी आर आय ही कंपनी निवडली आहे. आणि त्याची वर्क ऑर्डर 11/ 4/ 2025 रोजी निघाली असून त्याची installation तारीख 10 जून 2025 ही आहे. JSR मंजूर झाल्यानंतर भरपूर दिवस झाले असून अद्यापही आमच्या शेतामध्ये सोलार पंप बसविला गेला नाही. यामुळे शेतीसाठी पाणी देण्यास अडचण निर्माण होत आहे. त्याचबरोबर शेत पिकाचे नुकसान देखील होत आहे. या झालेल्या नुकसानाची भरपाई कंपनीकडून देण्यात यावी.तरी मेहरबान साहेबांनी सी आर आय या सोलार कंपनीकडून अद्याप पर्यंत पंप का बसविला गेला नाही याची लेखी स्वरूपात माहिती घेऊन मला ती कळवावी आणि कधीपर्यंत मला पंप बसवून दिल्या जाईल यासंदर्भातील माहिती मिळावी असा तक्रार अर्ज दिला आहे.
Post a Comment