Hanuman Sena News

जेसीबी व ट्रॅक्टर ची बॅटरी शेतातून चोरट्यांनी केली लंपास अज्ञान चोरट्यां विरुद्ध गुन्हा दाखल...

मलकापूर :- मलकापूर शहर मधील घिर्णी निवासी युवा व्यवसाय,बजरंगदल तालुका  सह संयोजक अनंता तुकाराम बगाडे यांचे स्वतःच्या मालकीचे JCB व ट्रक्टर दिनांक 26 ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता शेतातून अज्ञात चोरट्यांनी JCB व ट्रॅक्टरची बॅटरी व साहित्य किट चोरि केल्याची घटना घडली.घिर्णी येथील अनंता बगाडे JCB, ट्रॅक्टर चालक मालक व्यवसाय करून कुटुंबाचे पालण पोषन करीत असतात  दि. 26/08/2025 रोजी रात्री 10.00 वा. दरम्यान त्यांच्या मोबाइल वर आलेला तो संदेश रात्री 01.30 वा त्यांनी बघितला असता त्यांच्या JCB वाहनाच्या कोणीतरी बॅटरी काढल्या असल्याचे समजले असता रात्री 01.40 वा दरम्यान सदर ठिकाणी शेतात जावुन पाहीले असता JCB व ट्रक्टरला असलेल्या बॅटरी अनुक्रमे 130 MH व 90MH च्या दिसुन आल्या नाही तसेच, स्टाफलीक पार्ट, जॉक पाटा या वस्तुअंदाजे 30,000/-रु च्या वस्तु अज्ञात चोरुन नेल्या आहेत या घटनेच्या मलकापूर शहर पोलीस स्टेशन येथे येऊन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मलकापूर शहर पोलीस करीत आहेत

Post a Comment

أحدث أقدم