सौर विद्युत पंप, 1000 लिटर पाण्याची टाकी, घंटागाडी व पा.पू व्हाल तात्काळ जमा करण्याचे ग्रामपंचायत कडून आदेश
प्रतिनिधी
राहुल संबारे मलकापूर
मलकापूर:- मौजे बेलाड येथील ग्रामपंचायत सदस्य श्री संदीप शत्रुघ्न निंबोळकर, यांनी ग्रामपंचायत कार्यालयाचे साहित्य जसे की इलेक्ट्रिक घंटागाडी, विद्युत सौर पंप, 1000 लिटर पाण्याची टाकी व त्याच बरोबर पाणीपुरवठा व्हाल इत्यादी साहित्य हे ग्रामपंचायत कार्यालयाला कोणतीही पूर्व सूचना न देता परस्पर वापरत असल्याची माहिती ग्रामसभेत आल्याने एकच खळबळ उडाली. त्या संबंधित सन्माननीय सचिव साहेब तथा प्रभारी सरपंच यांनी ग्रामपंचायत कडून नोटीस काढत संबंधित सर्व साहित्य ग्रामपंचायत मध्ये तात्काळ जमा करून त्या संबंधित लेखी स्वरुपात कारणे दाखवावी अशी नोटीस काढली आहे.ग्रामपंचायत प्रशासनाचे साहित्य ग्रामपंचायत प्रतिनिधी यांनीच वैयक्तिक वापरासाठी वापरणे ही बाब अत्यंत निंदनीय असून यामुळे परत एकदा ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसत आहे..?
إرسال تعليق