नांदुरा: उन्हाळा कि पावसाळा या विचारातच विद्यार्थ्यांची उन्हाळी सुट्टी संपली असल्याचे दिसते.नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांचा आनंद कायम टिकवून शिक्षण देणे खुप महत्वाचे झाले आहे.अजित कॉन्व्हेंट,चांदुर बिस्वा येथे विद्यार्थ्यांचे सरस्वती पूजन व श्रीफळ फोडून नवीन वर्षाचा श्रीगणेशा करण्यात आला.शाळेचे निसर्गरम्य, आल्हाददायक वातावरणात विद्यार्थ्यांच्या आगमनाची तयारी करण्यात आली. मुख्याध्यापिका सौ. सरिताताई बावस्कार यांनी सरस्वती पूजन करून विद्यार्थ्यांचे औक्षण केले. विद्यार्थी वेदांत कारांगळे यांनी श्रीफळ फोडले. शाळेतील शिक्षिका यांनी विद्यार्थ्यांचे रांगोळी काढून तसेच विविध सजावटीसह तिलकलावून औक्षण करून पुष्प रुपी भेट देऊन स्वागत करण्यात आले.उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने शाळेत प्रवेश आनंद व्यक्त केला.यासोबतच पहिल्या दिवशी विविध शैक्षणिक उपक्रम घेण्यात आले.
अजित कॉन्व्हेंट चांदुर बिस्वा येथे नवीन शैक्षणिक वर्षाचा श्रीगणेशा विद्यार्थ्याच्या हातून श्रीफळ फोडून ..
Hanuman Sena News
0
Post a Comment