नांदुरा:- विविध खेळांनी आपल्या भारत देशाचे नाव जगाच्या पाठीवर सुवर्ण अक्षरात कोरल्याचे आपल्याला दिसते. उत्तम खेळाडू हा कोणत्याही भागामध्ये असला तरी त्याला शोधून त्यामध्ये असलेल्या गुणांना वाव देण्यासाठी विविध तालुका स्तरावर सुद्धा निवड चाचणी घेण्यात येते.बुलढाणा जिल्ह्यातील खेळाडूंसाठी आनंदाची बातमी म्हणजे बेस बॉल स्पर्धेसाठी उत्तम खेळाडूंसाठी नांदुरा शहरात सुद्धा बेस बॉल स्पर्धेसाठी निवड चाचणी करण्यात येणार आहे. बेस बॉल स्पर्धा ही १८ वी वरिष्ठ राज्यस्तरीय पुरुष व महिला अजिंक्यपद स्पर्धा दि. २० जुन ते २२ जुन रोजी अमरावती येथे असून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात पार पडणार आहे ; तरी या स्पर्धेची निवड चाचणी ही अजित इंटरनॅशनल स्कुल, नांदुरा येथे बुधवार दि. १८/०६/२०२५ रोजी पार पडणार आहे. सदर स्पर्धेच्या जिल्हा निवड समितीचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष श्री. सुजितजी इंगळे सर, कार्याध्यक्ष श्री. विजय पळसकरसर, जिल्हासचिव श्री. पुरुषोत्तम निळे सर, सहसचिव श्री. प्रफुल्ल वानखडेसर यांच्या मार्गदर्शनात करण्यात येणार आहे.सर्व खेळाडूंनी खेळासाठी लागणारे साहित्य स्वतः आणावे. सदर निवड चाचणीमधे जास्तीत जास्त संख्येने भाग घ्यावा असे आवाहन जिल्हा निवड समितीच्या वतीने करण्यात आले आहे.अधिक माहिती साठी संपर्क-
श्री. विजय पळसकर
7020971088,
श्री. प्रफुल्ल वानखडे सर
7588809766
श्री.पुरुषोत्तम निळे सर
9011142686
Post a Comment