Hanuman Sena News

महावितरण कंपनीकडून नांदुरा शहर व ग्रामीण नागरिकांच्या तक्रारीची दखल न घेतल्यास शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा...

 नांदुरा:- मूलभूत गरजा म्हणजेच जगण्यासाठी लागणाऱ्या अत्यावश्यक गोष्टी होत. या मूलभूत गर्जांमधे वीज (विद्युत सुविधा) ही सुविधा दैनंदिन जीवनात अत्यंत आवश्यक आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून नांदुरा शहरामधे डी.पी. जळणे, विद्युत तार खंडणे किंवा इतर काही कारणांमुळे नांदुरा वासियांचा विद्युत पुरवठा खंडित केल्या जात असल्याचे दिसते. वेळी -अवेळी कुठलेही पूर्वसूचना न देता तासन -तास विद्युत सेवा बंद राहण्याच्या घटना सामोर आल्या आहेत. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या पर्वभूमीवर सदर विषयास अनुसरून सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते,सामान्य नागरिक यांनी महावितरण कंपनीच्या कार्यालयात फोन करून विचारणा करण्याचा प्रयत्न केल्यास कार्यालयातील लँड लाईन फोन कुणीही स्वीकारत नाही. तसेच मोबाईल फोन द्वारे केलेला  संपर्क देखील स्विकारल्या जात नाही. सामान्यजनतेच्या अश्या तक्रारी शिवसेना नांदुरा शहर अध्यक्ष अनिल जांगळे यांच्या पर्यंत आल्या असता शिवसेना नांदुरा शहराच्या वतीने महावितरण कंपनीला निवेदन देण्यात आले.सोमवार दि. १६/०६/२०२५ रोजी शिवसेना शहर प्रमुख अनिल जांगळे यांनी निवेदनामधे नमूद केले कि,विद्युत म्हणजेच एक अत्यावश्यक सेवा असून आपल्या कर्तव्यानुसार कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत सामान्य नागरिकांच्या तक्रारिंची नोंद घेऊन उचित कार्यवाही करावी. काही दिवसांपूर्वी खैवाडी येथे १० वर्षाच्या मुलाला उघड्या तारां मुळे विजेचा शॉक लागून गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. ही बाब अत्यंत धक्कादायक असून यामध्ये महावितरण कंपनीचा बेजबाबदारपणा उघडीकीस आल्याचे दिसते. सोशल मीडियाच्या युगात महावितरण कंपनीने व्हाट्सअप ग्रुप द्वारे नागरिकांना वेळोवेळी विद्युत विषयक महत्वाचे संदेश किंवा अलर्ट पाठवून नागरिकांना सतर्क करावे. जुन्या आणि अतिरिक्त भार असलेल्या डी.पी बदलवून किंवा योग्य तो बदल त्यामध्ये करावा. नागरिकांना कायम व अखंड विद्युत पुरवठा जबाबदारीने पूरवावा. तसेच वरील नमूद तक्रारिंची त्वरित दखल घेऊन कार्यवाही न झाल्यास शिवसेनेच्या पद्धतीने कार्यवाही करण्यात येईल, त्यावेळी होणाऱ्या सर्व परिणामांना जबाबदार महाविद्युत कार्यालय राहील याची गांभीर्याने नोंद घ्यावी. यावेळी उपस्थित वारकरी सेवा समितीचे जिल्हा अध्यक्ष श्री. रामभाऊ झांबरे यांच्यासह महादेव सपकाळ, उपशहरप्रमुख, संजय मेहसरे - उपशहरप्रमुख, हरीश काटले- युवासेना प्रमुख, प्रकाश बावस्कार- शाखा प्रमुख, देवेंद्र जैस्वाल-शहर सचिव, जितेंद्र जुनगडे- शहर संघटक, शुभम ढवळे- वैद्यकीय कक्ष, संभाजी वसे - विभाग प्रमुख,पवन दुबे, मोहन जांगळे, राजेश ताकवाले, पवन जांगळे, प्रवीण घोळके, महेश उंबरकर, रविंद्र मात्रे, महिला आघाडी शहर प्रमुख सौ. सरिता बावस्कार, प्रज्ञा तांदळे - उपशहर प्रमुख, भावना सोनटक्के- शहर सचिव यांच्यासह इतर शिवसैनिक उपस्थित असून इ.च्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post