खामगांव :- (दि.14 जून) रक्तसेवेत सदैव अग्रेसर राहणाऱ्या एकनिष्ठा गौ -सेवा रक्तसेवा फाउंडेशननी जागतिक रक्तदाता दिवस 35 रक्तदात्यांनी गरजु रुग्णांना वेळेवर रक्तदान करून दिले नवीन जिवनदान देऊन साजरा केला. खामगांव येथील सामान्य रुग्णालयात भरती असलेले व तसेच खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना रक्ताची मदत करण्यात आली. एकनिष्ठा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या यादव यांच्या संकल्पेनेतून थैलीसिमिया, सिकलसील, गरोदर महिला, एच आय व्ही. अपघात ग्रस्त रुग्ण, ईतर आजार असलेल्या गरजु रुग्णांसाठी पुढाकार घेत 14 जून जागतिक रक्तदाता दिवस गरजूला रक्तदान करून साजरा केला यावेळी रक्तदाते विशाल भवर , हरीदास चरखे , धिरज सुसगोहर , कृष्णा चव्हाण , प्रदीप गवई , आकाश शेजव , सुरज हेलोडे , अमोल टिकार , अनिकेत गलांडे , गोपाल ईटीवाले , देवेश पारीक , पियुष काळोणे , नामदेव कुटे , किर्तीकुमार पुरोहीत ,,अमोल खवले , मोहन डाबेराव , अमोल मुकुंद , विश्वजीत इंगळे , ओमकार खवले , भुषण देशमुख , अनंता उगले , दिपक नेमाने , सुजित सावंग , कृष्णा राठी , जिवन धंदर , दिलीप शेजव , विशाल शेजव , अक्षय इंगळे , अतुल गलवाडे , आनंद कलोर , राहुल देशमुख , रविंद्र राऊत , चेतन कदम , समिर पठाण आदि रक्तनायकांनी रुग्णाचे प्राण वाचवून त्यांना रक्तदान करून दिले जिवनदान याप्रसंगी जिल्हा पर्यवेशक एड्स नियंत्रण श्री गजानन देशमुख व श्री संतोष दारमोडे शासकीय रकतपेढीचे रक्तसंक्रमण अधिकारी सौ. प्रणाली देशमुख , टेक्निशियन सौ. सपना कांबळे , सौ. चित्रा देशपांडे , सौ. राजश्री पाटील , परिचारिका भारती काळे , अशोक पराते , कु. ममता भारसाकळे , कु. आरती थोरात , कु. प्रिया गुरेकार , यांचे सहकार्य लाभले या रक्तसेवेत पत्रकार राजु घाटे , यश पवार , गौरव गजलकर , राजु बुंदे , पवन ससे , सुभाष निंबाळकर , शुभम क्षिरसागर , महेश पाटील मोताळा ,गोपाल बोचरे , भास्कर बावस्कर , इंद्रजित गंगावणे आदि लोकांनी परिश्रम घेतले. सर्व रक्तदाता यांना जागतिक रक्तदाता दिनाच्या शुभेच्छा एकनिष्ठा रक्तदाता फाउंडेशन कडून त्यांचा सत्कार करत देण्यात आल्या. अशी माहिती सुरजभैय्या यादव यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
एकनिष्ठाच्या 35 रक्तदात्यांनी रक्तदान करून जागतिक रक्तदाता दिवस साजरा केला...
Hanuman Sena News
0
Post a Comment