मलकापूर :- मलकापूर शहर मधील नांदुरा रोड रामवाडी वेशी जवळ एक गाय दिनांक 12 मे रोजी दुपारी 4 वाजता पासून 100 रुंद तर 4 फूट खोड अश्या नाली मध्ये पडली होती. स्थानिक निवासी माझी नगर सेवक अनिल गांधी व दोन नगर पालिका कर्मचारी यांनी रात्री 10 ते 11 वाजे पर्यंत तिला नाली मधून काढायचे पर्यंत केले पण जागा अरुद असल्या कारणाने अपयश आले.गाय भीत असल्यामुळे 100 फूट रुंद नालीमध्ये आत जाऊन लपली होती नालीत पाणी साचले होते त्यामुळे ती सतत 25 तास पासून उपाशी उभी होती अगोदर रात्र त्यात नाली रुंद असल्याने अंधार आत जाता येणे कठीण आत उतरले की ती जीवाला घाबरून मारायला यायची अशा गाईचे जीव वाचवायचे तरी कसे? सदर सूचना बजरंगदल च्या स्थानिक कार्यकर्ता यांना 13 मे रोजी दुपारी 4 वाजता मिळाली घटना स्थानी विहिप बजरंगदल चे दीपक चवरे, सुयोग शर्मा, निलेश लढा, बबलू बैरागी पोहोचले त्यांनी घटना स्थळ पाहणी केली गाईला काढायचे असेल तर खाली उतरल्या शिवाय पर्याय नाही निलेश लढा यांनी खाली उतरवून गाईला काढण्याचे प्रयत्न केले पण ते शक्य झाले नाही.नगर पालिका मुख्य कार्यकारी अधिकारी शेळके साहेब यांना फोन लावला तसेच मलकापूर तहसीलदार चव्हाण साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन घटनेची माहिती दिली तसेच गायीचे रेस्क्यू केले नाही तर एक मूक जीवाचा मृत्यू होईल ते वाचवण्या करिता जे.सी.पी, दोर ,या स्थितीत काम करणारी तज्ञ माणसांची आवश्यकता होती दीपक चवरे व सुयोग शर्मा यांचे सतत संबंधित अधिकारी यांच्याची संपर्क सुरू होते गाई उपाशी व 25 तासा पासून पाण्यात सतत उभी होती लवकर बाहेर काढले नाही तर तिचे मृत्यू निश्चित होते.नगर पालिका विभाग मधून अजय बयस, भुसारी,संतोष टाक,कुनाल पैठने, विशाल टाक, सागर खराडे, कृष्णा विधाने,अरुण ढोकणे,श्रीकांत इंगळे विश्व हिंदू परिषद गो रक्षा प्रमुख चे प्रविण जैन 13 मे रोजी दुपारी 5 वाजता हजर झाले व रेस्क्यू कार्य सुरू झाले.दोन व्यक्ती जीवाची पर्वा न करता नालीच्या एक बाजू हून आत काठीने गाईला हाकलून नालीच्या दुसऱ्या बाजूला आणतील व दुसरे लोक फासे टाकून तिला अडकवून बाहेर ओढून घेतील असे ठरले पण गाई 90 फूट पर्यंत यायची व पलटून जायची.ही प्रकिया दोन तास चालली पण गाय बाहेर येइना. मग दुसरे दोन व्यक्ती आत गेले आगीचा धाकाने गाई बाहेर येईल या करिता टेंबा मसाला पेटविली व आत गेले पण ऑक्सिजनच्या कमतरते मुळे टेंबा विझून जायचा खाली नाळी मध्ये काच आसारी पाणी साचलेले विषारी जीव यांचा धोका त्याने मुलांच्या शरीरास इजा पोहोचत होत्या परत अपयश आले पण या प्रयत्न यालाही अपयश आले.रात्रीचे 8 वाजले होते सदर रेस्क्यू ऑपरेशन बघण्या करिता स्थानीक वस्ती व नांदुरा रोड वरील रहदारी ने बघ्यांची गर्दी वाढत होती त्याने ती गाई अजून घाबरत होती.आता शेवटचे प्रयत्न करू आणि नाही जमले तर जी.सी पी ने ढापा फोडून गाय बाहेर काढू असे निर्णय सर्वांचे ठरले.कृष्णा विधाते यांनी एक युक्ती सुचली त्यांनी एक 20 फुटी एक दम हलका बासा बजरंगदल कार्यकर्ता यांना आणल्यास सांगीतले व फासा त्यात अडकून नाली मध्ये सोडण्यात सांगितले व दोन लोक यांना दुसऱ्या बाजूने गाईला हकलन्यास सांगितले गाई जर 80 फूट वर पोहोचली तर फासा तिच्या शरीरावर अटकेल आणि अटकले की गाई काढू तसे ठरले योजनेस यश आले आणि सर्व लोकांनी गाईला ओढून रात्री 9 वाजता बाहेर काढले.जशी ती गाई बाहेर निघाली तशी सर्व नागरिकाने जय श्रीराम ,जय गो माताच्या घोषणा दिल्या आणि एक आनंदाची लाट सर्व बजरंगदल नगरपालिका कर्मचारी यांच्या चेहऱ्यावर आली.त्या गाईला बाहेर काढल्या बरोबर अनिल गांधी यांनी गाईला गुड खायला दिले पाणी पाजले सदर गाईला बेलाड येथील गोरक्षण मध्ये पाठवण्यात आले तसेच उपचारा करिता उपविभागीय पशू चिकित्सक यांना संपर्क करण्यात आले.मलकापूर तहसीलदार चव्हाण साहेब,नगर पालिका मुख्य कार्यकारी अधिकारी शेळके साहेब सर्व कर्मचारी यांचे आभार विश्व हिंदू परिषद कडून दीपक चवरे यांनी मानले आणि असेच सहकार्य गो सेवे करिता भविष्यात लावावे अशी अपेक्षा वक्त केली.
बजरंगदल दल व नगर पालिका कर्मचारी यांनी दिले गाईला जीवनदान...
Hanuman Sena News
0
Post a Comment