Hanuman Sena News

विघ्नहर्ता ढोल ताशा पथक नांदुरा कडून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी...



 नांदुरा:-दरवर्षी तारखेनुसार आणि तिथीनुसार छत्रपती संभाजी महाराजांची जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. काल १४/०५/२०२६ म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांची तारखेनुसार जयंती असून, यानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून राजेंना विनम्र अभिवादन करण्यात आले.संभाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची प्रतिष्ठा वाढवली आणि ते आजही मराठी माणसांसाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या जीवनाने आणि कार्यांनी आपल्याला शौर्य, पराक्रम आणि देशभक्तीचा अर्थ शिकवला.विघ्नहर्ता महिला गणेशोत्सव मंडळ संचलित विघ्नहर्ता ढोल ताशा पथक नांदुरा च्यावतीने स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात वंदे मातरम चौक नांदुरा खुर्द मध्ये साजरी करण्यात आली. संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. विघ्नहर्ता ढोल ताशा पथक व मंडळाच्या अध्यक्षा सौ. सरिताताई बावस्कार यांनी धर्म रक्षक संभाजी महाराजांच्या शौर्याने मृत्यू नतमस्तक होऊन स्वराज्याच्या मातीसाठी शंभूराज्यांच्या अमरत्वाची गाथा स्पष्ट केली. संभाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत त्यांच्या कार्याला आदराने आणि श्रद्धेने स्मरण करण्यात आले. यावेळी विघ्नहर्ता महिला मंडळातील पदाधिकारी, ढोल ताशा पथक मधील वादक व सदस्य उपस्थित होते.

1 Comments

  1. धर्मशास्त्र पंडित,
    ज्ञानगोविंद, सर्जा, रणधुरंधर, छत्रपती श्री संभाजी महाराज की जय🚩🚩

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post