मलकापूर : स्थानिक मधुभाऊ सावजी मेमोरियल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्ड परीक्षेत यश संपादन केले.फेब्रुवारी/मार्च २०२५ या कालावधीत पार पडलेल्या बारावी बोर्डाचा विद्यार्थी प्रसाद भंडारी याने ९४.६० टक्के गुण प्राप्त करत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष नानाभाऊ येशी यांनी शाल श्रीफळ देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार घरी जाऊन केला व भावी उज्वल यशासाठी शुभेच्छा दिल्या .विशेष म्हणजे या विद्यार्थ्याने कोणत्याही प्रकारचे क्लासेस लावलेल्या नव्हत्या घरीच अभ्यास करून हे यश संपादन केले आपल्या यशाचे श्रेय आपल्या विद्यालयातील शिक्षण व आपल्या माता-पितांना दिले.
भाजपा युवा मोर्चा तर्फे 12वी CBSE तालुक्यातून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार...
Hanuman Sena News
0
Post a Comment