Hanuman Sena News

नांदुरा शहरातील बंद पडलेले "सी.सी.टीव्ही कॅमेरे व पथदिवे" त्वरित दुरुस्त करण्याचे शिवसेना नांदुरा शहराचे नगर परिषदेला निवेदन अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा...


नांदुरा:- नांदुरा शहर तसेच पंचक्रोशीमधील गावांमध्ये चोरी, छेडखानी तसेच इतर गुन्हेगारीच्या घटना समोर येताना आपण बघतो. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शहर प्रमुख अनिलभाऊ जांगळे यांच्या अध्यक्षतेत शिवसेना नांदुरा शहराच्या वतीने पोलीस स्टेशन नांदुरा येथे सिसिटीव्ही बसविन्याचा विनंती अर्ज दिला होता. या अर्जाची दाखल घेत नांदूरा शहरामध्ये ठिकठिकाणी सिसिटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले;सदर माहिती शिवसेना संघटनेला पत्राद्वारे कळविण्यात सुद्धा आली होती.मात्र काही काळापासून हे सिसिटीव्ही शोभेची वस्तू झाल्याचे दिसून येत आहे. नांदुरा शहरात दुचाकी वाहणांच्या  चोरीचे प्रमाण वाढले असून सिसिटीव्ही बंद असल्यामुळे या चोरीचा तपास लागणे कठीण झाल्याचे दिसते. यासोबतच अनेक भागातील पथदिवे बंद असल्याकारणाने रात्रीच्यावेळी व सकाळी सुर्योदयापुर्वी शिक्षणाकरीता तसेच शिकवणी वर्गांकरीता  जाणाऱ्या विद्यार्थीनी, नोकरी करणाऱ्या महीला यांना अंधारातुन जातांना टवाळखोर, चिडीमार हयांचे पासुन त्रास होण्याची संभावना अधिकप्रमाणात वाढली आहे व त्याबाबत तक्रारीदेखील प्राप्त झालेल्या आहेत. सदर पथदिव्यांच्या अडचणीबाबत विद्युत विभागात विनंती केली असूनसुद्धा त्यावर कारवाई झालेली नाही. यामुळे शिवसेना संघटनेसह सामान्य जनतेमध्ये संताप पसरला आहे. परंतू शहरातील सि.सि.टी.व्ही. बंद असल्यामुळे अनेक दुचाकी वाहनांच्या चोरीचा तपास लागु शकला नाही. तसेच नांदुरा शहरातील अनेक भागातील पथदिवे बंद असल्यामुळे रात्रीचे वेळी अनेक भागामध्ये अंधार पसरलेला असतो.  परंतू त्यांचेकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही किंवा बंद असलेले पथदिवे अद्याप सुरु करण्यात आले नाहीत. तरी आपणास हया निवेदनाद्वारे सुचित करण्यात येते की, नांदुरा शहरातील बंद असलेले सि.सि.टी. व्ही. कॅमेरे तसेच बंद असलेले पथदिवे त्वरीत सात दिवसाचे आत सुरु करण्यात यावेत. तसेच संवेदनशिल भागामध्ये व गर्दीच्या ठिकाणी नव्याने सि.सि. टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात यावेत. अन्यथा शिवसेना नांदुरा शहर यांचे कडून तीव्रस्वरूपात मुख्याधिकारी न.प. नांदुरा यांचे कक्षालगत ठिय्या आंदोलन करण्यात येईल व विद्युत विभागातील जबाबदार व्यक्तींबाबत तीव्र निषेधार्थ कारवाई केली जाईल, विद्युत अभियंता पजई साहेब हयांचे तोंडाला काळे फासण्यात येईल.. असे निवेदन शिवसेना शहर प्रमुख अनिल जांगळे यांच्या अध्यक्षतेत शिवसेना नांदुरा शहराच्या वतीने मा. मुख्याधिकारी साहेब, नगर परिषद नांदुरा यांना देण्यात आलेले आहे. शिवसेना संघटनेच्या जनहिताच्या ह्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून तातडीने यावर कारवाई न केल्यास होणाऱ्या परिणामांना नगर परिषद जबादर राहील असे देखील निवेदनामध्ये नमूद केले आहे. यावेळी हरिषभाऊ काटले-युवासेना प्रमुख, देवेंद्र जैस्वाल-उपशहर प्रमुख, संभाजी वसे-विभाग प्रमुख, महादेव सपकाळ,-उपशहर प्रमुख, संजय मेहसरे-उपशहरप्रमुख, जितुभाऊ जुनगडे-शहर संघटक, पवन जांगळे, महेश उंबरकर, संतोष जूनगडे, प्रकाश बावस्कार, बळीराम इंगळे, यांच्यासह इतर शिवसैनिकांचा सहभाग होता.

Post a Comment

أحدث أقدم