Hanuman Sena News

विघ्नहर्ता महिला गणेशोत्सव मंडळातर्फे उत्कृष्ट ढोल-ताशा वादकांचा गौरव; २६ आकर्षक ट्रॉफींचे व ३१ बक्षिसांचे उत्साहात वाटप संपन्न!




नांदुरा खुर्द : विघ्नहर्ता महिला गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणेशोत्सवादरम्यान आयोजित विविध स्पर्धांमधील विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळा तसेच ढोल-ताशा पथकातील वादकांचा सन्मान व मानधन वाटपाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. मंडळाच्या अध्यक्षा सौ. सरिता प्रकाश बावस्कर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली व उल्लेखनीय नियोजनाखाली हा सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.​गणेशोत्सवादरम्यान अध्यक्षा सौ. सरिता प्रकाश बावस्कार व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकाराने विविध सामाजिक व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सहभागी होऊन यश संपादन करणाऱ्या विजेत्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते ३१ आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. तसेच, गणेशोत्सवात आपल्या ढोल-ताशाच्या तालावर न्हाऊन निघणाऱ्या आणि परंपरेची जपणूक करणाऱ्या ढोल-ताशा पथकातील वादकांच्या मेहनतीची, समर्पणाची व कलेची दखल घेत त्यांना मानधनाचे वाटप करण्यात आले.​या शानदार सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून समाजसेविका रेखाताई लालाभाऊ इंगळे, नगरसेविका अर्चनाताई संदीप तळोले, श्रद्धाताई पवन खैरे आणि शिवसेना उपशहर प्रमुख भावनाताई सोनटक्के उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण व वादकांचा सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.​वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम: २६ वादकांचा आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मान​याप्रसंगी मंडळाच्या वतीने उत्कृष्ट ढोलवादक, ताशावादक, टोलवादक आणि झांजवादक अशा एकूण २६ वादकांना विशेष आकर्षक व देखण्या ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. या ट्रॉफींचे सुंदर आणि लक्षवेधी स्वरूप उपस्थितांसाठी विशेष आकर्षणाचा विषय ठरले. वादकांनी आपल्या अनोख्या कलेतून पथकाची परंपरा जपत गणेशोत्सवाची शोभा वाढवली असून, त्यांच्या या योगदानाचा गौरव करण्यासाठी मंडळाच्या अध्यक्षा सौ. सरिता बावस्कार व संपूर्ण टीमने हा कौतुकास्पद उपक्रम राबविला.विघ्नहर्ता महिला मंडळाच्या या स्तुत्य उपक्रमातून वादकांच्या कलेचा सन्मान, त्यांच्या कष्टाची कदर आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन करण्याचा एक सुंदर संदेश देण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post