पगार, महागाई भत्ता आणि दिवाळी बोनसच्या मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
प्रतिनिधी,
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली असून, मागण्यांची पूर्तता न झाल्यास आगामी ६ नोव्हेंबर २०२६ पासून राज्यव्यापी संप पुकारण्याचा इशारा दिला आहे. या संभाव्य संपामुळे राज्यातील एसटी वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये दर महिन्याच्या ७ तारखेला नियमित वेतन अदा करणे, ६० टक्के महागाई भत्ता (डीए) लागू करणे आणि दिवाळीनिमित्त १५ हजार रुपयांचा बोनस देणे या मागण्यांचा समावेश आहे.कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या १). दर महिन्याच्या ७ तारखेला वेतन मिळावे. २.) कर्मचाऱ्यांना ६० टक्के महागाई भत्ता लागू करावा. ३.) दिवाळीनिमित्त १५ हजार रुपयांचा बोनस द्यावा.
या मागण्यांबाबत महामंडळ आणि संबंधित प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे. मागण्यांवर तोडगा न निघाल्यास ६ नोव्हेंबरपासून संपाचे पाऊल उचलले जाऊ शकते.प्रवाशांचे लक्ष प्रशासनाच्या निर्णयाकडे आहे.एसटी महामंडळाची सेवा राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे संप प्रत्यक्षात झाल्यास विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी आणि सर्वसामान्य प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आता कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर प्रशासन काय भूमिका घेते आणि संप टाळण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Post a Comment