समाजसेवा व संघटन कौशल्याची दखल; महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचा महत्त्वपूर्ण निर्णय
मलकापूर : अखिल भटक्या विमुक्त जाती-जमाती महासंघ, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या वतीने मलकापूर येथील संतोष रामदास जाधव, रा. मुकुंद नगर, मलकापूर, ता. मलकापूर, जि. बुलढाणा यांची विदर्भ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.संघटनेच्या कार्याचा विस्तार, समाजसेवेतील योगदान तसेच प्रभावी संघटन कौशल्याची दखल घेत महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीने त्यांच्यावर विदर्भाची जबाबदारी सोपविली आहे.विदर्भातील भटक्या-विमुक्त जाती-जमाती समाजाच्या विविध प्रश्नांना संघटितपणे वाचा फोडणे, समाजातील नागरिकांना त्यांच्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक करणे तसेच संघटनेचे कार्य अधिक व्यापक करण्यासाठी संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात विविध उपक्रम राबविले जाण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.या नियुक्तीमुळे मलकापूरसह बुलढाणा जिल्ह्यातील समाजबांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, संतोष रामदास जाधव यांच्या नियुक्तीचे विविध स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Post a Comment