Hanuman Sena News

तालुक्यास्तरीय नाट्य स्पर्धेत चांडक विद्यालय अव्वल ; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड...


मलकापूर : शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव २०२६-२७ च्या तालुकास्तरीय स्पर्धेत ली. भो. चांडक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावत जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळविला. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विविध पैलूंवर आधारित नाटिकेच्या प्रभावी सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली.विद्यार्थ्यांना वर्तमान तसेच भविष्यातील विज्ञान, तंत्रज्ञान आणि त्याच्या उपयोगांची आवश्यकता गमतीदार व मनोरंजक पद्धतीने समजावी, या उद्देशाने शिक्षण विभागातर्फे शहरातील चांडक विद्यालय येथे राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्राचार्य निवृत्ती निंबोळे, शिक्षक प्रवीण केला, प्रमोद वाडीकर, वैशाली जोशी, सकळकळे सर यांच्यासह तालुका विज्ञान शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.तालुक्यातील विविध विद्यालयांच्या विद्यार्थी संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला. चांडक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिक्षिका कुलकर्णी मॅडम, कुसुंबे मॅडम व  राठोड सर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘समाज आणि विज्ञान’ या विषयावर आधारित नाटिका सादर केली. ऐतिहासिक घटना, समुद्रातील जलकन्या, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), प्लास्टिकचा वाढता वापर आदी विविध विषय व भूमिका प्रभावीपणे सादर करीत विद्यार्थ्यांनी विज्ञानाचा समाजाभिमुख उपयोग आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. या प्रभावी सादरीकरणाची दखल घेत परीक्षकांनी चांडक विद्यालयाच्या विद्यार्थी संघाला प्रथम क्रमांक घोषित केला. त्यामुळे या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दाताळा येथील विद्यार्थी संघाने द्वितीय, तर जी. प. विद्यालय, हरसोडा यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. जीवन विकास विद्यालय, दुधलगाव यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.चांडक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल विद्यालय परिसरात त्यांचे कौतुक होत असून, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post