Hanuman Sena News

मलकापूरमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीचा जल्लोष; रशियामध्ये शिवरायांचा पोवाडा गायल्याचा देखावा ठरला मुख्य आकर्षण...


मलकापूर : साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मलकापूर शहरात यंदा मोठ्या उत्साहात, जोशपूर्ण वातावरणात आणि थाटामाटात जल्लोषात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत सर्वधर्मसमभावाचे दर्शन घडवत सर्व समाजातील तरुण, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.जयंती मिरवणुकीचे विशेष आकर्षण म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी रशियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केल्याचा साकारण्यात आलेला देखावा. या देखाव्याने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. अण्णाभाऊंच्या साहित्यिक व शाहिरी कार्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जगभर पोहोचल्याची प्रेरणादायी आठवण या देखाव्यातून जागविण्यात आली.मिरवणुकीमध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध दीपक बँड (गलंगी) यांच्या वाद्यवृंदाने उपस्थितांमध्ये उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण केले. ढोल-ताशे, बँडच्या तालावर तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग आणि महामानवांच्या जयघोषाने संपूर्ण मलकापूर शहर दुमदुमून गेले.या जयंती सोहळ्यास विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच सर्व स्तरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोणताही राजकीय किंवा सामाजिक भेद न ठेवता सर्वांनी एकत्र येत अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले.मलकापूर शहरासह तालुक्यातील मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने या जयंती सोहळ्यात सहभागी झाले होते. महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि बालकांचा सहभागही लक्षणीय होता. त्यामुळे संपूर्ण मिरवणुकीला सामाजिक एकतेचे आणि बंधुभावाचे स्वरूप प्राप्त झाले.मिरवणुकीदरम्यान सर्व महामानवांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. सामाजिक समता, बंधुता, स्वाभिमान आणि परिवर्तनाचा संदेश देणाऱ्या अण्णाभाऊंच्या विचारांचा जागर यावेळी करण्यात आला.मलकापूरच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणावर, सर्व समाजघटकांना सोबत घेऊन आणि सर्वधर्मसमभावाचे दर्शन घडविणारी अण्णाभाऊ साठे जयंतीची मिरवणूक यापूर्वी पाहायला मिळाली नसल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. उत्साह, शिस्त, सामाजिक एकोपा आणि महामानवांच्या विचारांचा जागर यामुळे यंदाची जयंती मलकापूरकरांच्या स्मरणात राहणारी ठरली.कार्यक्रमाचे आयोजक राजकुमार लक्ष्मण वानखेडे  महादेव ओंकार चंदनशिव   सागर जगदेव तांबे   अर्जुन दशरथ तायडे अजय चंदनशिव सागर वानखेडे ईश्वर बांगर नितीन खंडारे नितीन चंदनशिव  छोटू चंदनशिव  विनोद तायडे प्रमोद बांगर अभिषेक चंदनशिव पवन तायडे लहू शक्ती मित्र मंडळ छत्रपती शिवाजीनगर मित्र मंडळ

Post a Comment

Previous Post Next Post