Hanuman Sena News

मलकापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह; शिक्षकांच्या गैरहजेरीबाबत पालकांच्या तक्रारी...


मलकापूर : मलकापूर तालुक्यातील काही जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा खालावत असल्याची चर्चा असून, शिक्षक नियमितपणे शाळेत उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी पालकांकडून होत असल्याचे समोर आले आहे. शिक्षकांच्या अनुपस्थितीचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होत असल्याने पालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व नियमित शिक्षण मिळणे अपेक्षित असताना काही ठिकाणी वर्गांचे नियमित अध्यापन होत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम मागे पडण्याची शक्यता असून, पालकांनी संबंधित शिक्षण विभागाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे.मलकापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याची माहिती जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शाळांमधील उपस्थिती, अध्यापनाची स्थिती आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती याची प्रशासनाने तपासणी करणे आवश्यक असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.शिक्षण विभागाने अचानक तपासणी करावी शिक्षकांची उपस्थिती, शाळेतील दैनंदिन अध्यापन, विद्यार्थ्यांची उपस्थिती तसेच अभ्यासक्रमाची पूर्तता याबाबत शिक्षण विभागाने अचानक तपासणी करून वस्तुस्थिती समोर आणावी. शिक्षक विनाकारण गैरहजर आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी,अशी मागणी पालकांकडून होत आहे.पालकांच्या तक्रारींची चौकशी होणार का?मलकापूर तालुक्यातील ज्या शाळांबाबत शिक्षकांच्या गैरहजेरीच्या तक्रारी आहेत, त्या शाळांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सत्य परिस्थिती स्पष्ट करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم