मलकापूर शहरातील बुलढाणा रोडवरील आनंद भेल भंडार ते हनुमान टॉकीज दरम्यान असलेली मोठी नाली पूर्णपणे चोकअप झाल्यामुळे परिसरातील नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अतिवृष्टी झाल्यास नाल्याचे पाणी दुकाने व व्यावसायिक आस्थापनांमध्ये शिरून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नगर परिषद, मलकापूर यांना निवेदन देऊन सदर नालीची तात्काळ साफसफाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.हे निवेदन जिल्हाध्यक्ष व अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष मा. श्री. नाजेर काझी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल मा. सुभाषभाऊ देव्हडे व जिल्हा कार्याध्यक्ष मा. प्रसादभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अरुणभाऊ अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष बाळू पाटील, तालुका अध्यक्ष राजू साठे, शहराध्यक्ष राजू डोफे, नगरसेवक अॅड. मजीद कुरेशी, नगरसेवक अब्दुल हबीब चौहान, जिल्हा उपाध्यक्ष श्रवण वाघ तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.नगर परिषद प्रशासनाने सदर बाबीची तातडीने दखल घेऊन नालीची साफसफाई करावी, अन्यथा भविष्यात पावसामुळे होणाऱ्या नुकसानास नगर परिषद प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते :
राजू डोफे (शहराध्यक्ष), अमोल टाप (शहर कार्याध्यक्ष), अब्दुल हबीब चौहान (नगरसेवक), इरफान भाई, कलीम भाई, इमरान शेख, लखन कुरेशी, जफर खान, प्रकाश भाऊ आणि नरेंद्र सुरडकर आदी उपस्थित होते.
إرسال تعليق