मलकापूर: मलकापूर ते मध्य प्रदेश प्रबोधना च्या प्रवासाला नवे पंख विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथून धर्मजागृतीची मशाल पेटवणारे युवा हिंदू प्रबोधनकार ह.भ.प. केशव महाराज किन्होळकर आता आपल्या प्रभावी वाणीचा माध्यमातून मध्यप्रदेशात कीर्तन करणार आहेत. महाराष्ट्रभर कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणाऱ्या महाराजांची ही वाटचाल आता राज्याच्या सीमा ओलांडून नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. मध्यप्रदेशात कीर्तनाच्या निमित्ताने मराठी भाषेतील कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.त्यामुळे मराठी संस्कृतीचा सुगंध तिथे पोहोचला आहे. महाराष्ट्राबाहेर होणाऱ्या अशा कीर्तनामुळे मराठी माणसाचा अभिमान उंचावला आहे. शुक्रवार २४ तारखेला वडगाव माफी येथे भव्य कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाकडे भक्तांचे लक्ष लागले आहे. धार्मिक, सामाजिक आणि संस्कारमूल्यांचा संदेश देणाऱ्या त्यांच्या कीर्तनाची सर्वत्र चर्चा रंगू लागली आहे. तरुणांच्या हृदयात नवी चेतना आपल्या ओजस्वी वाणीने आणि तळमळीच्या विचारांनी युवकांमध्ये धर्म, संस्कार आणि समाजसेवेची प्रेरणा जागवणारे केशव महाराज हे आजच्या पिढीसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. त्यांच्या कीर्तनातून केवळ अध्यात्म नव्हे, तर समाजप्रबोधनाचा प्रभावी संदेश दिला जातो.भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण “महाराजांचे कीर्तन म्हणजे विचारांची क्रांती आहे. आता ते मध्यप्रदेशात येत असल्याने आम्ही भाग्यवान आहोत,” अशा भावना भक्तांकडून व्यक्त होत आहे व कीर्तनाची उत्सुकतेने वाट पाहत आहे.
युवा हिंदू प्रबोधनकार ह.भ.प. केशव महाराज किन्होळकर यांच्या कीर्तनाची वाणी मध्यप्रदेशात घुमणार!
Hanuman Sena News
0
Post a Comment