मलकापूर :मलकापूर शहरातील जमिनीच्या वादातून अन्याय झाल्याचा आरोप करत न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी राजकुमार लक्ष्मण वानखेडे यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. दिनांक १० एप्रिल २०२५ पासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर नगर परिषद हद्दीतील सुमारे ५४५ क्रमांकाच्या जागेवरून वाद निर्माण झाला आहे. संबंधित जागेवर पूर्वी रहिवासी पक्षकारांनी प्रतिज्ञालेख सादर केला होता. त्यानंतर नगरपालिकेकडून सदर जागा भोगवटादार म्हणून सचिन ओझळ यांच्या नावावर नोंद करण्यात आली होती.मात्र, नंतर हा प्रतिज्ञालेख चुकीने झाल्याचे कारण देत नायब तहसीलदारांनी तो रद्द केल्याचे कळविले. त्यानंतर नगर परिषदेकडून संबंधित नोंदीत बदल करून जमीन पुन्हा वादग्रस्त ठरविण्यात आली. या सर्व प्रक्रियेत अन्याय झाल्याचा आरोप करत वानखेडे यांनी न्यायाची मागणी केली आहे.यापूर्वीही त्यांनी उपविभागीय अधिकारी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर केले होते, मात्र त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.या प्रकरणात संबंधित नायब तहसीलदारावर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे, तसेच संबंधित जमीन भोगवटादार म्हणून पूर्ववत नोंद करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे.या मागण्यांसाठी वानखेडे यांनी उपोषण सुरू केले असून, प्रशासनाने लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
إرسال تعليق