मलकापूर (लोणवाडी) :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मध्यरात्रीपासूनच अनुयायांचा उत्साह ओसांडून वाहत होता.जब तक सूरज चाँद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा', अशा गगनभेदी घोषणा देत आबालवृद्ध महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या गौरवगीतांवर बेधुंद होऊन थिरकले. मंगळवारी गावामध्ये भीमजयंतीचा अमाप उत्साह पाहायला मिळाला.रस्त्यावर अक्षरशः निळे चैतन्य पसरले होतेच; परंतु गावातून चौकाकडे जाणाऱ्या सर्वच रस्त्यांवर वेगवेगळ्या वसाहतींमधून भीमरथ पुढे सरकत होते.बोधिसत्त्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी गावातून जल्लोषात मिरवणूक निघत असते. पण, यंदाचा जल्लोष काही वेगळाच होता. मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्वांचेच चेहरे आनंद आणि अभिमानाने खुलून दिसत होते.भीमरथावर व गीतांवर प्रत्येकजण थिरकताना दिसत होता. मिरवणुकीत सहभागी भीमरथावर समाजाला संदेश देणारे देखावे लक्षवेधी ठरले. स्वागतमंच उभारून मिरवणुकीत सहभागी उत्सव समिती पदाधिकाऱ्यांचे व विविध पक्षातील मान्यवर नेत्यांचे स्वागत करीत होते.आग ओकणारा सूर्य शांत होताच सायंकाळी मिरवणूक मार्गात नागरिकांची गर्दी वाढली. गावातील विविध भागांसह ग्रामीण भागांतील भीमसैनिक मिरवणूक पाहण्यासाठी आले.संपूर्ण मिरवणूक मार्ग गर्दीने फुलून गेला. पाय ठेवायलाही जागा नव्हती.डोक्यावर निळी टोपी, हातात झेंडा आणि ओठांवर घोषणा. अनेकांच्या शर्टवर 'जय भीम'शुभ्र वस्त्रे परिधान करून तरुण-तरुणी, महिला-पुरुष मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणूक यशस्वी करण्यासाठी लोणवाडी गावातील भीम सैनिकांने विशेष परिश्रम घेतले.
"जय भीम" च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला; लोणवाडी गावात भीमसागर...
Hanuman Sena News
0
Post a Comment