Hanuman Sena News

व्याजाच्या पैशाची वसुली करण्यासाठी जिवे मारण्याची व मुलाचे अपहरण करणार्‍यांवर कारवाई करा- भाजपा युवानेते अरविंद किनगे यांची पो.स्टे.ला तक्रार..



मलकापूर : व्याजाने घेतलेले पैसे मागण्यासाठी जिवे मारण्याची व मुलाचे अपहरण करण्याची धमकीची तक्रार भाजपाचे युवानेते अरविंद मनोहर किनगे रा. चाळीसबिघा मलकापूर यांनी मलकापूर शहर पो.स्टे.ला २४ फेब्रुवारी रोजी दिली आहे.दिलेल्या तक्रारीत नमूद आहे की, मी गणेश वैतकार रा.कुंड, ह.मु. वरणगाव व सचिन पाचपोळ रा.धरणगाव यांचेकडून २ टक्के दराने व्याजाने ११ लाख रूपये जानेवारी २०२६ मध्ये आर्थिक अडचण आल्यामुळे घेतले होते.मला वेगवेगळ्या तारखेस आरटीजीएस व फोन पे द्वारा माझ्या खात्यात व माझ्या पत्नीच्या खात्यात मला पाठविले होते. त्यावेळी त्यांनी मला २ टक्के दराने व्याज देण्याबाबत ठरविले होते.परंतु आता मला तो म्हणाला की, मला आता मासिक १५ टक्के दराने व्याज लागेल. आम्ही दान-पुण्य करण्यासाठी पैसे व्याजाने देत नाही. जर तू पैसे दिले नाहीतर तुझ्या जिवाची जबाबदारी तुझ्यावर राहील, तसेच मला २ मुले असून ते स्कुल ऑफ स्कॉलर्स या शाळेत शिकतात. त्या शाळेतूनच शाळा सुटल्यावर तुझ्या मुलांना घेवून जावू व १५ टक्के दराने पैसे वसुल करेल. त्यांना मी माझ्या पत्नीच्या नावे असलेल्या कॅनरा बँकेचे चेक प्रत्येकी ३ लाख ५० हजार रू.असे एकूण ७ लाख रू. दिले आहे.तरी उपरोक्त दोघेही माझी परिस्थिती ऐकून घेण्याच्या मानसिकतेत नाही व ते वारंवार धमक्या देत आहेत.२३ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता सचिन पाचपोळ हा माझ्याकडे आला व त्याने मला सांगितले की गणेश वैतकर याने मला पाठविले आहे. पैसे घेवून या अन्यथा त्याला १२ तासाची मुदत देणे असे सांगितले. तरी गणेश वैतकर व सचिन पाचपोळ हे १५ टक्के दराने व्याजाची वसुली करीत असून व न दिल्यास मला जिवे मारण्याची धमकी व मुलांचे अपहरण करण्याची धमकी देत आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.समाजात व राजकारणात माझे वाढत चाललेलं वर्चस्व त्याचप्रमाणे व्यवसायात होत असलेली प्रगती बघून काही विघ्नसंतोषी मला बदनाम करण्याचे षडयंत्र रचत असून माझ्या विरूध्द विविध अफवा उठवून व नाहक बदनामी करून मला समाजातून व राजकारणातून उठविण्याचा कुटील डाव खेळत आहे. पोलीस प्रशासनावर माझा पुर्ण विश्वास असून मला योग्य तो न्याय मिळेल याची खात्री आहे.मलकापूर २ टक्के व्याजाने घेतलेली रक्कम १५ टक्क्यावर आणल्यामुळे व जिवे मारण्याची तसेच मुलांचे अपहरण करण्याची तक्रार २४ फेब्रुवारी २०२६ ला दिल्याने गणेश विष्णु वैतकार याने नोकरीचे आमिष दाखवून ३.८२ लाख रूपयांची माझी फसवणूक अरविंद किनगे यांनी केली, अशी तक्रार दि.१३ मार्च २०२६ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी यांचेकडे दिली. यामध्ये ना मी बाजार समितीचा संचालक आहे ना मी सभापती वा विद्यमान आमदार चैनसुख संचेती यांच्या नावाचा कोठेही नोकरी लावून देण्यासाठी वापर केलेला नाही. व्याजाच्या १५ टक्के बाबत तक्रार केल्याने वैतकरचे पित्त खवळले व त्याने भाजपाची व माझी बदनामी करण्याचा कट रचला.

Post a Comment

Previous Post Next Post