पालक आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने परिसर दुमदुमला; मुख्याध्यापिका सरिताताई बावस्कार यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक
चांदुर बिस्वा (प्रतिनिधी): येथील नामांकित अजित कॉन्व्हेंट मध्ये दोन दिवसीय वार्षिक क्रीडा महोत्सवाचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे ०५ फेब्रुवारी पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी, तर ६ फेब्रुवारी दुसऱ्या दिवशी खास पालकांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला समाजसेवे मध्ये अग्रेसर असणारे मयूर बघे व सुषमा बघे मॅडम कृषी व्यवसायात निपुण असणारे आढाव सर आणि उत्कृष्ट कलाकार चित्रकार वानखडे सर, चरणसिंह वतपाळदादा यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद, स्व. स्वतंत्र्य सेनानी जालमसिंह इंगळे आमचे प्रेरणास्रोत स्व.अजितसर इंगळे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली. पंचक्रोशीत अशा प्रकारचा अभिनव प्रयोग पहिल्यांदाच राबवण्यात आल्याने पालक आणि नागरिकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.विद्यार्थी अन् पालकांचा रंगला थरार कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी विविध मैदानी खेळांमध्ये आपला कसब दाखवला. दुसऱ्या दिवशी पालकांसाठी आयोजित स्पर्धांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दैनंदिन धावपळीतून वेळ काढत पालकांनीही मैदानात उतरून खेळाचा आनंद लुटला. या दोन दिवसांत संपूर्ण पंचक्रोशीतील पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.यशस्वी नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे कारण या आगळ्यावेगळ्या क्रीडा महोत्सवाचे संपूर्ण श्रेय शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सरिताताई बावस्कार यांना जाते. त्यांच्या कल्पकतेतून आणि मार्गदर्शनाखाली हा सोहळा यशस्वीरित्या पार पडला.सांघिक प्रयत्नांतून यश मिळतेच हे या कार्यक्रमातून दिसून आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्पोर्ट्स टीचर श्री.पुरुषोत्तम निळे सर यांनी अथक परिश्रम घेतले यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक वृंद आणि कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. शिस्तबद्ध नियोजन आणि सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा क्रीडा महोत्सव एक अविस्मरणीय सोहळा ठरला.चांदुर बिस्वा परिसरात पहिल्यांदाच पालकांसाठी अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्यामुळे पालकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले "शाळेच्या मुख्याध्यापिका सरिताताईंनी यापुढेही असेच नाविन्यपूर्ण कार्यक्रम आयोजित करावेत," अशी भावना अनेक पालकांनी यावेळी व्यक्त केली.
Post a Comment