मलकापूर:- आपल्या मलकापुरातील रहिवाशी हिंदू धर्माचे व सनातन धर्माचे अभ्यासक ह.भ.प. केशव महाराज किन्होळकर युवा हिंदू प्रबोधनकार यांचा नुकताच काल दि. 25 जानेवारी रोजी सकाळी साखरपुडा पान्हेरा येथे संपन्न झाला. साखरपुड्यानंतर महाराजांनी सायंकाळी आपल्या मलकापुरातील शिव कॉलनी येथे चालू असणाऱ्या भागवत सप्ताहात आयोजित केलेल्या कीर्तनात कीर्तनाची तारीख एक महिना अगोदर घेतली होती,त्यांचा साखरपुडा सात दिवसात संपन्न होणार होता .पण काही कारणास्तव 25 तारखेलाच साखरपुडा आयोजित करण्यात आला. एक तारीख खाली राहत असल्यामुळे,त्यांनी ठरवलं की किर्तनाला नकार न देता.आपल्या आयुष्यातला सुंदर दिवस साखरपुड्यानंतर संध्याकाळी घरी पोहोचल्यावर कीर्तनाला त्याच जोशात ते हजर राहिले. अभ्यासू विचारक, युवा चैतन्य निर्माण करणारे धगधगता इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा मांडत अध्यात्मावर बोलत त्यांनी किर्तन ज्वलंत आवाजात मांडले.त्यांच्याशी संपर्क साधता व विचारता कीर्तन नकरायला हवे होते,असे म्हणताच त्यांनी एकच उत्तर दिले .धर्म जोपासण्याकरता आपण पुढे नाही आलो तर कोण येईल.त्यांचं हे धर्मा करता सेवा देण्याचे काम ते अविरत चालू ठेवतील असे ते संभाषणात बोलले सकाळी साखरपुडा आणि संध्याकाळी कीर्तन तरीही त्यांनी आपला धर्म जोपासत पहिले प्राधान्य आपल्या धर्माच्या प्रचार व प्रसार करण्यासाठी ते पुढे सरसावले त्यांनी सांगितले की कितीही अडचणी आल्या तरी माझा कीर्तनाचा कार्यक्रम अविरतपणे चालू राहील. ह. भ. प. केशव महाराज किन्होळकर आपल्या मलकापुरातील माता महाकाली नगरातील रहिवाशी आहेत.त्यांचा स्वतःचा किन्होळकर फेटा नावाचे व्यवसायीक प्रतिष्ठाण आहे.त्यांना " युवा हिंदू प्रबोधनकार म्हणून ओळखतात." मलकापूर बजरंग दल नगर संयोजक ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे. तसेच शिवप्रेमी संघटना संचालक आहेत.पुढे संभाषणात ते बोलले आपला धर्म जपावा लागेलच आपल्या धर्माला प्रचाराची गरज नाही.पण तो टिकून ठेवनेही काळाची गरज आहे तसेच आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. आणि माझ्या कीर्तनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम मी अविरतपणे करत राहील असे त्यांनी सांगितले.
समाजाची बांधीलकी जपत स्वतःचा साखरपुडा होताच ह.भ.प.केशव महाराजांनी मलकापुरात केले कीर्तन...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق