Hanuman Sena News

युवा चेहरा सामाजिक कार्यकर्ते नानाभाऊ येशी मलकापूर ग्रामीण पंचायत समिती सदस्य म्हणून निवडणूक रिंगणात उभे राहणार...







मलकापूर:- देवदाबा जिल्हा परिषद व मलकापूर ग्रामीण पंचायत समिती सर्कल यांच्या निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार आहे त्याकरिता उमेदवार निवडणुकी करिता निवडणुकीच्या तयारी सुरु झाल्या असून राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. तसेच सामाजिक कार्यकर्ते ही कामाला लागलेले आहेत प्रत्येक गावात जाऊन बैठका सुरू झाल्या आहेत. देवधाबा जिल्हा परिषद व मलकापूर ग्रामीण पंचायत समिती सदस्य बनण्याची स्वप्न उराशी बाळगुन असलेल्या इच्छुक आपापल्या गट व गणात मोर्चे बांधणी करत आहेत. नेत्यांच्या निवडणुकीकरिता युती आघाडीचा फार्मूला अवलंबला जातो. परंतु स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वबळावर लढण्याची संकेत दिले जात आहेत.त्यामुळे सर्व इच्छुक उमेदवार आपापली तयारी करतांना दिसत आहे त्यातच सामाजिक कार्यकर्ते हनुमान सेनेचे कार्यकारी अध्यक्ष तथा मुख्य संपादक न्यूज हनुमान सेनाचे नानाभाऊ ओंकारराव येशी यांनी शनिवार दिनांक 20/12/2025 शनिवार रोजी सायंकाळी 7:00 वाजता मलकापूर ग्रामीण पंचायत समिती सर्कल मध्ये प्रचाराचे सुरुवात जांभूळ धाबा या गावातील श्री हनुमान मंदिर येथून सुरुवात केली श्री हनुमानाची पूजा करून नारळ अर्पण केले व हनुमान चालीसा चे पठण करून पत्रकरुपी मनोगत जनतेसमोर सादर केले त्यात त्यांनी केलेल्या कार्याची संपूर्ण माहिती देऊन मतदार राजांना मतदान करण्याची साद घातली.व कार्यकर्त्यांना कामाला लागन्याच्या सूचना दिल्या आपली सत्ता यावी म्हणून कार्यकर्त्यांना कामाला लावले आहेत गावाच्या ज्येष्ठ नागरिकांसोबत चर्चा केली असता त्यांनी गावाच्या विकासासाठी काय करणार याची चर्चा झाली असून त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांच्या हाताला काम नाही यावर कोणताही पक्ष आक्रमक भूमिका घेताना दिसत नाही त्यामुळे मतदारांमध्ये नाराजीचा सूर लोकांनी नानाभाऊ येशी यांच्यासमोर व्यक्त केला. यावर लवकर तोडगा काढू असा नाना भाऊंनी त्यांना शब्द दिला. व स्वयंरोजगार उपलब्ध करून देऊ असे सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post