Hanuman Sena News

विघ्नहर्ता महिला मंडळाकडून सलग पाचव्या वर्षी 'भुलाबाई महोत्सव' उत्साहात साजरा...




जुनी गाणी व संस्कृती टिकवण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम; महिला व युवतींचा मोठा सहभाग


नांदुरा :- आपली लुप्त होत असलेली भुलाबाईची गाणी व भुलाबाई संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी विघ्नहर्ता महिला गणेश उत्सव मंडळाने आयोजित केलेला 'विघ्नहर्ता सार्वजनिक भुलाबाई महोत्सव' सलग पाचव्या वर्षीही उत्साहात पार पडला. काल, ६ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या या अनोख्या कार्यक्रमात असंख्य युवती व महिलांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.संस्कृती टिकून राहावी आणि महिला व मुलींचे संघटन वाढावे या एकमेव उद्देशाने मंडळाने हा नावीन्यपूर्ण उपक्रम चालू ठेवला आहे. भुलाबाई महोत्सवाच्या निमित्ताने सर्व महिला आणि युवतींनी एकत्र येऊन पारंपरिक भुलाबाईची गाणी म्हटली. गाण्यांनंतर रीतसर आरती झाली आणि नंतर खिरापत (भुलाबाईचा प्रसाद) वाटण्यात आली.यावेळी मंडळाच्या अध्यक्षा सौ. सरिताताई बावस्कार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी सर्व महिलांना आपली संस्कृती टिकून कशी राहील याकडे लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. तसेच, आपल्या मुलींना जुन्या परंपरा व संस्कृतीचे महत्त्व समजावून सांगून त्या कशा टिकवून ठेवता येतील, यावर त्यांनी भाष्य केले.महिलांनी एकत्र येऊन आपली संस्कृती जतन करण्यासाठी केलेल्या या प्रयत्नामुळे जुन्या पिढीतील परंपरांचा वारसा नव्या पिढीला मिळत आहे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. मंडळाचा हा उपक्रम समाजाला एक उत्तम संदेश देणारा ठरला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post